एकही शिधापत्रिकाधारक धान्यापासून वंचित राहणार नाही

पुरवठा विभागाची माहिती


रास्तभाव दुकानामध्ये ईपीडिएस प्रणाली लागू

पुणे – अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून रास्तभाव दुकानामध्ये ईपीडिएस प्रणाली लागू करण्यात आली आहे. यामध्ये शिधापत्रिकाधारकाचा आधार क्रमांक त्याच्या शिधापत्रिकेस जोडण्यात आला आहे. शिधा वाटप करतांना पॉस मशीन्सवर शिधापत्रिकाधारकांचा अंगठा पडताळणी करून धान्याचे वितरण करण्यात येत आहे. मात्र, एखाद्या शिधापत्रिकाधारकास मागील महिन्यापर्यंत धान्य मिळत होते. तथापी पॉस मशीनवर नोंद नाही. या कारणास्तव धान्य नाकारले जाणार नाही. मागील महिन्यापर्यंत धान्य मिळाले आहे, अशा कोणत्याही शिधापत्रिकाधारकास धान्यापासून वंचित ठेवले जाणार नसल्याचे पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र शासनाकडून पॉस मशीन्स जून 2017 पासून रास्त भाव दुकानांमध्ये लावण्यात आली आहे. तेव्हापासून या मशीन्समधून धान्याचे वाटप करण्यात येत आहे. नविन ईपीडिएस प्रणाली अंतर्गत आधार क्रमांकावरून शिधापत्रिकाधारकाचा शिधापत्रिका क्रमांक शोधून त्याला धान्य वाटप करता येते. ईपीडिएसमध्ये आधार पडताळणी करताना काहीवेळा वयोवृध्द व्यक्तीच्या अंगठ्याचा ठस्याची पडताळणी होत नाही. अशावेळी नॉमिनीच्या बायोमॅट्रीकद्वारे अशा व्यक्तींना धान्य वितरीत करण्यात येत आहे.

आधार पडताळणी करताना शिधापत्रिकेवरील नमूद व्यक्तींमधील कोणत्याही व्यक्तीचा अंगठा दिला तर चालतो मशिनमध्ये नावाची नोंदणी झालेली दिसून येत असल्यास मशीनवरच आधार क्रमांक जोडणी करता येते. एखाद्या शिधापत्रिकाधारकास मागील महिन्यापर्यंत धान्य मिळत होते; पण आता पॉस मशिनवर नोंद नाही असे दिसल्यास त्या व्यक्तीची नोंदणी करून घेऊन त्यांनाही धान्य वाटप करण्यात येत आहे. मागील महिन्यापर्यंत धान्य मिळालेल्या कोणत्याही शिधापत्रीकाधारकास धान्यपासून वंचित ठेवण्यात येणार नाही. तसेच प्रत्येक दुकानांमध्ये याबाबत माहितीपत्रक देखील लावण्यात आले असल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

कोणत्याही शिधापत्रिकाधारकांनी ईपीडीएसमध्ये येणाऱ्या अडचणींबाबत तक्रार नोंदविण्यासाठी पुरवठा विभागाने हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे. 7620343324 असा हेल्पलाईन क्रमांक आहे. या क्रमांकावर तक्रार केल्यास त्याची नोंद घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ व्यवस्था करण्याची सूचना देण्यात येणार आहे. तक्रारदार आपले नाव, ज्या दुकानातून धान्य मिळते त्या रास्तभाव दुकानात नाव, परिमंडळाचे नाव आणि मोबाईल क्रमांक याची माहिती देणे आवश्‍यक आहे. ही हेल्पलाईन 28 एप्रिलपासून सुरू होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)