एकही गरीब घरापासून वंचित रहाणार नाही

प्रांताधिकारी आयुष प्रसाद : भोमाळे येथे कातकरी बांधवांना सहा घरकुलांचे हस्तांतरण

राजगुरूनगर- आदिवासींना घरकुल देण्यासाठी जमीन, दाखले, पाणी यासारख्या अनेक अडचणी असल्या, तरी त्या त्वरीत सोडून एकही गरीब घरापासून वंचित रहाणार नाही यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन सहायक जिल्हाधिकारी तथा खेडचे प्रांताधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.
रेलफोर फाउंडेशन, पुणे यांच्या सहकार्यातून भोमाळे खालचे (ता. खेड) येथे कातकरी बांधवासाठी बांधण्यात आलेल्या सहा घरकुलांच्या हस्तांतरण समारंभात प्रसाद बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक प्रभाकर गावडे, सभापती सुभद्रा शिंदे, गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार, रेलफोर फाउंडेशनचे नितीन घोडके, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, सचिन लांडगे, भोमाळेचे सरपंच सुधीर भोमाळे, ग्रामसेवक राजाराम रणपिसे, उपसरपंच नयना शिंदे, सदस्य रामदास सावंत, संतोष मराडे, मंगल भोमाळे, विलास भागीत, पांडुरंग जठार, दुर्गा नांगरे, पोलीस पाटील संदीप कोकाटे, दुलाजी भोमाळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
आयुष प्रसाद म्हणाले की, घरकुलांसाठी शासन निधीची अडचण भासू देणार नाही. कातकरी सारख्या आदिवासींच्या तीन आदिम जाती आहे. त्यांना विषेश दर्जा देण्यात येणार आहे. त्यासाठी
जीआर बनविण्याचे काम शासन पातळीवर सुरू आहे. याबरोबरच शिधापत्रिकेवरील धान्य वितरणातील विस्कळीतपणाचा फटका सर्वसामान्यांना बसतो. यासाठी नियोजित पायलट प्रकल्प आम्ही बनविला आहे. शिधापत्रिका धारकांना कुठल्याही दुकानात यापुढे धान्य मिळू शकेल, रअसे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक राजाराम रणपिसे, सूत्रसंचालन आनंदा शिंदे तर गटविकास अधिकारी इंदिरा आस्वार यांनी आभार मानले.

  • खेड तालुका घरकुल बांधण्याच्या कामात जिल्ह्यात एक नंबरवर आहे. अजूनही खेड तालुक्‍यात 293 घरकुल लाभार्थी आहेत. त्यांच्या जागेचा प्रश्‍न सुटल्यास घरकुल बांधण्यास अडचण येणार नाही. कातकऱ्यांनी व्यसनापासून दूर रहावे. मुलांना शिक्षण द्यावे. कातकरी समाजातील नागरिकांनी शासनाच्या सुविधांचा फायदा घ्यावा.
    – प्रभाकर गावडे, प्रकल्प संचालक, जिल्हा परिषद

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)