एकवीरा देवी पायथ्याशी गुरुवारी सामुदायिक विवाह सोहळा

कार्ला – वेहरगाव (कार्ला) देवी एकवीरेच्या पायथ्याशी गरीब व गरजू लोकांचा विवाह सोहळाचा खर्च टाळ्ण्यासाठी श्री एकविरा जोगेश्‍वरी अन्नदान हरगावच्या वतीने गुरूवारी (दि. 26) सायंकाळी 5.56 मिनिटांनी परिससरातील 15 जोडप्यांच्या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

दरवर्षी वेहरगाव-कार्ला येथे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. सोहळ्याचे सहावे वर्षे असून, आतापर्यंत 69 जोडपी या विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झाली आहेत. या वर्षीही या सोहळ्याचे मोठ्या उत्साहात आयोजन केले गेले आहे.

या वेळी 15 वधु-वरांच्या विवाह सोहळ्यासाठी लागणाऱ्या विविध वस्तूंच्या जबाबदाऱ्या दानशूर व्यक्‍तींनी स्वत: घेतल्या. या विवाहसोहळ्याची विशेष बाब म्हणजे विवाहस ोहळ्यात लग्न करणाऱ्या प्रत्येक वधूस दरवर्षी प्रमाणे मंगळसूत्र, पायातील पैंजन, जोडवी, लग्नाची साडी, सोन्याची नथ व कन्यादान म्हणून पाच भांडी तर साखरपुड्यासाठी लग्नास लागणाऱ्या कपडे तर व पाण्याची व्यवस्था व लग्नाला येणाऱ्या वऱ्हाडी मंडळीच्या भोजनाची सोय तसेच नियोजन समितीच्या वतीने नवरदेव मुलांची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक ही काढली जाणार आहे.

या विवाह सोहळ्याचे आयोजन विवाह सोहळा अध्यक्ष जितेंद्र बोत्रे, कार्याध्यक्ष नंदकुमार पदमुले, मिलिंद बोत्रे, भाई भरत मोरे, दिपक हुलावळे, सरंपच दत्तात्रय पडवळ, उपसरपंच सचिन येवले,किरण हुलावळे,मधुकर पडवळ, बाळासाहेब भानुसघरे, चंद्रकांत शेलार, गणपत पडवळ, मनोज देशमूख, राजू देवकर यांच्यासह सर्व विवाह सोहळा समिती सदस्य व ग्रामस्थ वेहरगाव पंचक्रोशीतील नागरिक करणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)