एकवीरा देवी गडावर एकलव्य युवा मंच तर्फे स्वच्छता मोहीम

कार्ला, (वार्ताहर) – वेहेरगाव येथील आई एकवीरा देवी गडावर युवा सेना मावळ तालुका व एकलव्य युवा मंचच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. आई एकवीरा देवीची चैत्र यात्रा पार पडली. यावर्षी मोठ्या प्रमाणात भाविकांनी यात्रेसाठी गर्दी केली होती. त्यामुळे गडावर मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. आज युवा सेना मावळ तालुका व एकलव्य युवा मंचच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

लोणावळा उप विभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्‍वर शिवथरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी युवा सेना मावळ विधानसभा चिटणीस विशाल हुलावळे, एकलव्य युवा मंचचे संस्थापक प्रवीण देशमुख, अध्यक्ष गणेश केदारी, उपाध्यक्ष अविनाश देसाई, युवा सेनेचे अविनाश शिंदे, विनायक खोलासे, नितीन देशमुख, सूरज देशपांडे, ऋषिकेश म्हाळसकर, मयुर थोपटे, प्रतीक देशमुख, युवा सेना व एकलव्य मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)