एकवीरा देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या दाम्पत्यावर काळाचा घाला

कार्ला – जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कार्ला फाट्यावर दुचाकी आणि कंटेनरचा धडकेत दुचाकीवरील दाम्पत्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी (दि. 15) दुपारी दोनच्या सुमारास ही धक्‍कादायक घटना घडली. सुशांत हिंदुराव निकम (वय 27) आणि त्यांची पत्नी आरती (वय 23, दोघेही रा. वांजोळी, ता. खटाव, जि. सातारा) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेलवरुन निकम दाम्पत्य आज सकाळी साताऱ्याला निघाले होते. दुपारी कार्ला एकवीरा देवीच्या दर्शनासाठी थांबले. एकवीरा देवीचे दर्शन घेऊन दुपारी दोनच्या सुमारास दुचाकीवर कार्ला फाट्यावर पुण्याच्या दिशेने जात होते. त्याचवेळी मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या कंटेनरची (एम.एच.43 ए.डी. 4577) दुचाकीला (एम. एच. 11 सी. पी. 8511) बसली. त्यावेळी सुशांत निकम यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. दोघेही रस्त्यावर पडल्याने कंटेनरच्या चाकाखाली सापडून मृत्यू झाला.

कार्ला फाट्याजवळ आजपर्यंत अनेक अपघात झाले असून, अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या चौकात एकवीरा देवी मंदिराकडे जाणारा रस्ता असल्याने वाहनांची वर्दळ असते. शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालये, बॅंका असल्याने अनेक जण येण्या-जाण्यासाठी रस्त्याचा वापर करतात. आठवड्यात अनेकदा अपघाताचे सत्र सुरूच असते. वाहने खूप वेगाने मुंबईकडून पुण्याकडे जात असतात. वेहरगाव, दहिवली, शिलाटणे, टाकवे येथील शाळेत येणाऱ्या लहान मुला-मुलींना, वृद्ध व्यक्‍तींना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरावा लागतो.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)