एकवीरा देवस्थान ट्रस्टवर प्रशासकांची नियुक्‍ती

  • उच्च न्यायालयाचे आदेश

लोणावळा – मागील एक वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या कार्ला येथील श्री एकवीरा मंदिर देवस्थान ट्रस्टवर शासकीय प्रशासक नेमण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी (दि. 4) पारित केले आहे. प्रशासक म्हणून प्रथम वर्ग न्यायालय, वडगाव मावळचे दिवाणी न्यायाधीश यांची नियुक्‍ती करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली.

समस्त कोळी, आगरी, सोनार, सीकेपी समाजाची कुलदेवता म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कार्ला एकविरा देवीच्या मंदिराच्या कळसाची वर्षभरापूर्वी चोरी झाली होती. त्यानंतर देवस्थान ट्रस्टमध्ये अनंत तरे गट आणि ग्रामस्थांचा गट असे दोन गट पडून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आजवर या दोन्ही गटांत अनेक आरोप प्रत्यारोप झाले. अनेक मुद्यांवर हे गट परस्परांच्या विरोधात धर्मादाय आयुक्त न्यायालयात उभे राहिले.

अनंत तरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात देखील एक अपील दाखल केले होते. त्यावर निर्णय देत उच्च न्यायालयाने जोपर्यंत धर्मदाय आयुक्‍त कार्यालयात प्रलंबित असणाऱ्या “चेंज रिपोर्ट’वर निर्णय होत नाही, तोवर ट्रस्टचा सर्व कारभार बघण्यासाठी प्रशासकाची नियुक्‍ती करण्याचे आदेश दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)