एकवीरा गडावर शनिवारी चैत्री यात्रा

  • पालखी सोहळा : शुक्रवारी माहेरघर देवघरला भैरवनाथ महाराज उत्सव

कार्ला, (वार्ताहर) – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आगरी कोळी लोकांचे कुलस्वामिनी कार्ल्याच्या आई एकविरा देवी चैत्री यात्रा पालखी सोहळा शनिवारी (दि. 24) कार्ला गडावर संपन्न होणार आहे.

दरवर्षी प्रमाणे या वर्षी संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत व जागृत देवस्थान आई एकविरा देवीची चैत्री यात्रा व मानाचा कार्यक्रम उत्साहात साजरा होणार आहे. उत्सवाची सुरवात शुक्रवारी (दि. 23) सायंकाळी सात वाजता देवीचे माहेरघर देवघर येथे देवीचा भाऊ भैरवनाथ महाराजांचा पालखी सोहळ्याने होणार आहे.

मुख्य पालखी सोहळा आई एकविरा देवीचा पालखी सोहळा सायंकाळी सात वाजता एकवीरा गडावर देवस्थान विश्‍वस्त पदाधिकारी व लाखो एकवीरा भाविकांच्या उपस्थित होणार आहे. रविवारी (दि. 25) रोजी पहाटे तीन वाजता तेलवानाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

कोकण, मुंबईसह लाखो भाविक गडावर
यात्रेनिमित्त तीन दिवस कोकण, मुंबईसह महाराष्ट्रातील लाखो भाविक कार्ला एकविरादेवी गडावर येत असल्याने मावळ महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या वतीने बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच यात्रा काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी एकविरा देवस्थान ट्रस्ट व मावळ प्रशासन यात्रा निविघ्न पार पाडावी यासाठी सज्ज झाले आहे.

गडावर तीन दिवस “ड्राय डे’
यात्राकाळात गड व कार्ला परिसरात होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी गडावर फटाके, डीजे, बॅंन्ड अशा प्रकारच्या सर्व वाद्यावंर बंदी घालन्यात आली असून, तीन दिवस दारू बंदी (ड्राय डे) करण्यात आली आहे. देवस्थान ट्रस्टच्या अंतर्गत वादामुळे एकविरादेवी पालखी सोहळ्यावर याचा परिणाम होताना दिसत आहे.त्यामुळे भाविकांची संख्या देखील कमी होऊ शकते कायदा सुव्यवस्था राखन्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात येणार आहे.

गावकऱ्यांकडून अखंड पाणी आणि वीजपुरवठा
कार्ला फाटा ते मंदिर दर्शन रांगेपर्यंत सुलभतेने दर्शन व्हावे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विविध ठिकाणी वाहनतळाची सुविधा करण्यात आली आहे. आरोग्य विभागाद्वारे प्राथमिक उपचार कक्ष 24 तास पाणी व अखंडित विजपुरवठा, फिरते शौचालय अशा अनेक सुविधा पुरवण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्न करणार असल्याचे सरपंच दत्तात्रय पडवळ व उपसरपंच सचिन येवले यांनी सांगितले.

प्रशासकीय यंत्रणा कामाला…
यात्राकाळात येणाऱ्या सर्व भाविकांना सर्व सुखसुविधा प्राप्त होव्यात यासाठी प्रांतआधिकीरी सुभाष बागडे, तहसिलदार रणजीत देसाई, एकविरा देवस्थान ट्रस्टचे अनंत तरे, विजय देशमुख, विलास कुटे, नवनाथ देशमुख, काळूराम देशमुख, मदन भोई, संजय गोविलकर, पार्वताबाई पडवळ, सरंपच दत्तात्रय पडवळ, उपसरपंच सचिन येवले, लोणावळा पोलीस उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्‍वर शिवथरे, मावळ प्रभारी गटविकास अधिकारी गुर्जर, लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्यासह सर्व शासकिय विभागाचे प्रमुख व त्यांचे पथक कार्यरत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)