एकवीरा गडावर घटस्थापनेने नवरात्र उत्सवास प्रारंभ

कार्ला : वेहरगाव एकवीरा देवीच्या मंदिरात घटस्थापना पूजा करताना तहसीलदार रणजित देसाई.

कार्ला – महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला-वेहरगाव गडावरील कुलस्वामिनी आई एकवीरा देवीच्या मंदिरात बुधवारी (दि 10) घटस्थापनेने नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला.

महाराष्ट्रातील आगरी कोळी, कुणबी समाजाची तसेच ठाकरे घराण्याची कुलदैवत असणाऱ्या कार्ला एकवीरा देवीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. बुधवारी सकाळी सात वाजता एकवीरा देवस्थान प्रशासकीय मंडळाचे सचिव, मावळ तहसीलदार रणजित देसाई यांच्या हस्ते सपत्नीक घटस्थापना करण्यात आली.

-Ads-

या वेळी एकवीरा देवस्थानचे विश्‍वस्त संजय गोविलकर, नवनाथ देशमुख, काळूराम देशमुख, विजय देशमुख, वेहरगाव सरपंच दत्तात्रय पडवळ, पोलीस पाटील अनिल पडवळ, माजी सरपंच गणपत पडवळ, कार्ला मंडल अधिकारी माणिक साबळे, ऍड.जयवंत देशमुख, नितीन देशमुख, भरत हुलावळे, अतुल वायकर, दिपक देशमुख, विनायक हुलावळे, गणेश हुलावळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

या नवरात्र उत्सवाच्या काळात भाविकांना सहजतेने आणि सुलभपणे देवीचे दर्शन घेण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आली. एक रांगेत भाविकांना देवीचे दर्शन देण्यात येणार आहे. गडावर भाविकांना पिण्याचे पाणी, वैद्यकिय सुविधा मिळाव्यात तसेच विना अडथळा गडावर जाता यावे याकरिता संबंधित विभागाने नियोजन करण्याच्या सूचना तहसीलदार रणजित देसाई यांनी सर्व विभाग अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

एकवीरा देवस्थानच्या वादामुळे प्रथमताच वेहरगाव कार्ला गडावर यात्रेचे संपूर्ण नियोजन न्यायालय नियुक्‍त प्रशासकीय मंडळ करीत आहे. या प्रशासकीय मंडळाद्वारे यात्राकाळात येणाऱ्या खर्चासाठी इच्छुक देणगीदार भाविकांना आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार अनेक देणगीदारांनी पुढे येऊन विविध खर्चाची जबाबदारी उचलली. यात प्रकाश पोरवाल यांच्या अध्यक्षतेखालील एकवीरा भक्‍त मंडळ, विश्‍वस्त संजय गोविलकल आणि ऍड. जयवंत देशमुख, दशरथ देवकर, श्रीरंग पडवळ, दत्तात्रय बोत्रे, हुकाजी गायकवाड, नाना बोरकर, उमेश मोरे आदींचा समावेश आहे.

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)