एकविरा देवी पालखी सोहळ्याचे प्रस्थान

पिंपरी – एकविरा सेवा संघ ट्रस्ट महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने नववर्षानिमित्त आयोजित वाल्हेकरवाडी ते कार्ला एकविरा देवी पालखी सोहळ्याचे प्रस्थान उत्साहात झाले.

पालखीचे पूजन उपमहापौर सचिन चिंचवडे, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, नगरसेविका संगीता भोंडवे, सुरेश भोईर, स्विकृत नगरसदस्य बिभीषण चौधरी, कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, कार्यकर्ते शेखर चिंचवडे, राजेंद्र चिंचवडे, हेमंत ननावरे यांच्या हस्ते करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संघाचे संस्थापक अध्यक्ष सुधीर आबा वाल्हेकर आणि महिला प्रदेश अध्यक्षा पल्लवी वाल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पायी वाल्हेकरवाडी ते कार्ला देवी पर्यंत पालखी सोहळ्याचे आयोजन मागील बारा वर्षांपासून करण्यात येत आहे. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी काही जण पहाटेपर्यंत हॉटेलमध्ये आनंद लुटतात. काही जण गाण्याच्या तालावर मद्यधुंद अवस्थेत चित्रविचित्र अंगविक्षेप करताना नाचतात. तर काहीजण सहलीला जातात. या सर्वांना फाटा देत वाल्हेकरवाडीवासियांनी या सोहळ्यात सहभागी होत व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प केला. शिवाजी आवारे, विनोद राठीड, बिरुमल चोबे, विशाल मोहिते, गणेश गिरी, महेश ढाकोळ, राजू सोनार, संतोष सोरटे, उत्तरेश्वर शिंदे, संतोष पवार, हर्षवर्धन कुऱ्हाडे, संतोष तिकोणे यांनी संयोजन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)