एकलहरेत वटपौर्णिमेनिमित्त वटवृक्ष संवर्धन

संग्रहित फोटो

मंचर – एकलहरे (ता. आंबेगाव) येथील बाग वस्तीवरील चारंगबाबा मंदिरासमोर वटपौर्णिमेचे औचित्य साधून महिलांनी नवीन वडाच्या झाडाचे संवर्धन करून बुधवारी (दि. 27) पूजन करण्यात आले. पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन रिना डोके, कविता डोके, पुष्पलता भांगे, अनिता डोके, रेखा शेलार, सविता भुजबळ, सविता रोकडे, कल्पना डोके, दीपा भांगे, सरोज कुर्डे या महिलांनी पुढाकार घेऊन वटवृक्षाचे पूजन करून रोपण केले. पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने या महिलांनी गावात बहुतांशी ठिकाणी वृक्षारोपण करण्याचा मानस यावेळी व्यक्त केला. सर्व महिलांनी एकत्रित येऊन येणाऱ्या पावसाळ्यात गावांमध्ये झाडे लावून ती जबाबदारीने जगवण्याचा निश्‍चय केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)