एकलहरेत महादेव मंदिर आणि परिसराचे सुशोभीकरण सुरू

मंचर – एकलहरे (ता. आंबेगाव) येथील श्री शंकर महादेव मंदिर आणि परिसर सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन एकलहरे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच नवनाथ मारुती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाविक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. एकलहरे येथील दिलीप वऱ्हाडी, संदीप डोके आणि अंकुश डोके यांनी सामाजिक बांधीलकी जपून श्री शंकर महादेव मंदिर परिसर सुशोभीकरण आणि मंदिराचे काम चालू केले आहे. त्या कामाचा अंदाजित खर्च पाच ते सहा लाख रुपये असून, हा खर्च हे उद्योजक स्वतः करणार आहेत. मंदिर परिसरात संरक्षक भिंत, डागडुजी, तसेच ज्येष्ठ नागरिकांकरिता बसण्याची व्यवस्था आणि लहान मुलांसाठी विरंगुळा केंद्र, खेळणी बसविण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल डोके यांनी दिली. या कामाच्या भूमिपूजनावेळी सरपंच उज्ज्वला शिंदे, उपसरपंच नवनाथ शिंदे, ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल डोके, अर्चना डोके गावातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)