एकरी 100 टन ऊसउत्पादन सहजशक्‍य

संग्रहित छायाचित्र...

आळेफाटा-ऊस पिकाचे योग्य व्यवस्थापन केल्यास एकरी 100 टन उत्पादन शेतकरी सहज घेऊ शकतात, असे मत राहुरी कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. सुभाष शिंदे यांनी व्यक्त केले.
बोरी (ता. जुन्नर) येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)अंतर्गत एकरी 100 टन ऊस उत्पादन या विषयावर शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी सरपंच पुष्पा कोरडे, मंडल कृषी अधिकारी तुपे, विलास डुंबरे, संजय कुटे, कृषी सहाय्यक, कृषी मित्र व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डेक्कन शुगर इन्स्टिट्युटचे शास्त्रज्ञ बोखरे, आत्माचे प्रकल्प संचालक अनिल देशमुख, प्रगतशिल शेतकरी सुभाष मोरे, जमादार यांनी ऊस पिकातील खोडवा व्यवस्थापन, एकरी 100टन ऊस उत्पादन तंत्रज्ञान, आत्मा योजनांची माहिती, खोडवा प्रात्यक्षिके व ऊस उत्पादन, खोडवा व्यवस्थापन व खोडव्यापासून मिळणाऱ्या उत्पादनामध्ये सातत्य कसे ठेवावे व पाचट न जाळता ते कसे कुजवावे व त्यापासून मिळणारे फायदे व हुमणी व्यवस्थापन, ऊस बियाणे रोपवाटिका कशी करावी, इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले. प्रशिक्षण कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते अमोल कोरडे, बाबाजी बांगर यांचे सहकार्य लाभले. धोंडीभाऊ पाबळे यांनी सूत्रसंचलन केले. सूर्यकांत विरणक यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)