एकरी सव्वा कोटी भावावर शेतकरी ठाम

तळेगाव एमआयडीसी- तळेगाव एमआयडीसी येथील टप्पा क्र. चार मधील शेतकऱ्यांनी भू-संपादनाला शासनाने दिलेल्या एकरी 66 लाख 36 हजार 552 या दराला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध केला. एकरी सव्वा कोटी दर देण्यावर शेतकरी ठाम आहेत. प्रस्तावित भू-संपादनाठी जिल्हाधिकारी नलकिशोर राम यांच्या बरोबर शेतकऱ्यांची बैठक झाली. मात्र, नुकसान भरपाईच्या रकमेवर एकमत न झाल्याने ही बैठक तहकूब करण्यात आली.

मावळ तालुक्‍यातील आंबळे, कल्हाट, पवळेवाडी येथील शेतकऱ्यांच्या जमिनीचा समावेश आहे. जिल्हाधिकारी रामकिशोर नवल यांनी भू-संपादनाचे हेक्‍टरी 1 कोटी 65 लाख 91 हजार 380 रुपये एवढा, तर एकरी 66 लाख 36 हजार 552 रुपये जाहीर केले. मात्र एकराचा भाव हेक्‍टरला देण्यात आल्याने शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला.
आमदार संजय भेगडे, शांताराम कदम, भिकाजी भागवत, दत्ताञय पडवळ, शिवाजी भेगडे यांनीही बाजू मांडली. शेतकऱ्यांनी आपल्या मागणीचा विचार करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी रामकिशोर नवल यांना दिले. बाळा भेगडे, शोभाताई कदम, गुलाबराव म्हाळसकर, शांताराम कदम, बाळासो. काकडे, सुदर्शन खांडगे, भिकाजी भागवत, दत्तात्रय पडवळ, सुदाम कदम, मोहन घोलप, ऍड. सोमनाथ पवळे, बबुशा भांगरे व शेतकरी यावेळी उपस्थित होते. एम. आय. डी. सी. चे प्रादेशिक अधिकारी संजय देशमुख यांनी प्रास्ताविक केले. मावळचे उप विभागीय अधिकारी सुभाष भागडे यांनी आभार मानले.

दर निश्‍चितीशिवाय भू-संपादनास विरोध
शासनाने ठरवलेले दर शेतकऱ्यांना मान्य नाहीत. दर व मागण्या मान्य झाल्याशिवाय जमिनींचे संपादन करू देणार नाही, अशी भूमिका शेतकरी बचाव कृती समितीने घेतली. त्यामुळे आता या प्रकरणी नेमका कोणता तोडगा काढला जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सहा वर्षे जुने दर का?
2013 मध्ये केंद्र सरकारने केलेल्या कायद्यानुसार सदर दर लाड समितीने निश्‍चित केले आहेत. मात्र, हे दर निम्मेच असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. शेतकऱ्यांना मान्य होईल, असा दर सरकारने द्यावा, अशी मागणी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)