एकमेव कसोटी सामना : भारताने संधी गमावली, अफगाणिस्तानचे पुनरागमन 

भारत पहिला डाव 6 बाद 347 धावा 

बंगळुरू – पहिल्या सत्रातील शिखर धवनची जोरदार फटकेबाजी आणि मुरली विजयचे शानदार शतक यानंतरही अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्यामुळे येथे सुरू झालेल्या एकमेव कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर भारतीय संघाला 6 बाद 347 धावांचीच मजल मारता आली. चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू असलेल्या या ऐतिहासिक कसोटीत सलामीवीर मुरली विजय आणि शिखर धवन यांच्या शतकांमुळे भारतीय संघाने पहिल्या सत्रात चांगली सुरुवात केली. मात्र एक बाद 280 अशा सुस्थितीतून अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी भारताचे सहा फलंदाज परतवीत सामन्यात पुनरागमन केले. शिखर धवनने आक्रमक खेळी करत पहिल्या सत्रातच शतक नोंदवत विक्रमी कामगिरी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यानंतर दुसऱ्या सत्रातील दुसऱ्याच षटकांत धवनला बाद करताना यामिन अहमदझाइने भारताला पहिला धक्‍का दिला. धवन आणि मुरली विजय यांनी पहिल्या विकेटसाठी 28.4 षटकांत 168 धावांची भागीदारी केली. शिखर धवनने 96 चेंडूंत 19 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 107 धावा केल्या. त्यानंतर दोन वेळा पावसाचा व्यत्यय आल्यानंतरही भारताने एका गड्याच्या मोबदल्यात 248 धावांपर्यंत मजल मारली होती. धवन परतल्यानंतर मुरली विजय आणि लोकेश राहुल जोडीने भारताचा डाव सावरला. मात्र सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यानंतर पुन्हा खेळ थांबवावा लागला. यानंतर दोन्ही पंच आणि सामनाधिकाऱ्यांची चहापानाच्या सत्रानंतर सामना सुरू होतील असे संकेत दिले. खेळ सुरू झाल्यावर चौकार मारत विजयने आपले शतक पूर्ण केले. विजयने 153 चेंडूंत 15 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 105 धावा केल्या. तर लोकेश राहुलही 54 धावा करून लगेचच बाद झाला.

विजयने राहुल सोबत 21.1 षटकांत 112 धावांची भागीदारी केली. यानंतर भारतीय फलंदाजांनी केवळ हजेरी लावण्याचे काम केले ज्यात चेतेश्‍वर पुजारा 35, अजिंक्‍य रहाणे 10 व दिनेश कार्तिक 4 धावा करून बाद झाले. पहिल्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा हार्दिक पांड्या नाबाद 10 व रविचंद्रन अश्‍विन नाबाद 7 धावांवर खेळत होते.

संक्षिप्त धावफलक – भारत पहिला डाव- 78 षटकांत 6 बाद 347 धावा (शिखर धवन 107, मुरली विजय 105, लोकेश राहुल 54, चेतेश्‍वर पुजारा 35, यामिन अहमदझाई 32-2, वफादार 53-1, मुजीब उर रेहमान 69-1, रशीद खान 120-1).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)