एकबोटे यांच्या जामिनावर 4 एप्रिलला सुनावणी

पुणे – शिरूर तालुक्‍यातील भीमा कोरेगाव येथे दंगल झाल्याप्रकरणात ऍट्रॉसिटी कायद्यानुसार अटक केलेल्या समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे (वय 61, रा. शिवाजीनगर) यांच्या जामिनावर 4 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. विशेष न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांच्या न्यायालयात ही सुनावणी होणार आहे.

1 जानेवारी 2018 रोजी शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी संपूर्ण राज्यातून हजारोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी जमले होते. त्यावेळी तेथे दगडफेक, जाळपोळ झाली होती. ही दंगल घडवून आणल्याप्रकरणी शिव प्रतिष्ठाणचे प्रमुख संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे, योगेश नरहरी गव्हाणे, गणेश भाऊसाहेब फडतरे आणि अनिल दवे या पाच जणांवर शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये ऍट्रॉसिटी, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, जाळपोळ, सार्वजनिक नुकसान, सशस्त्र हल्ला, बेकायदेशीर जमाव, संघटीत गुन्हेगारी या कलमानुसार गुन्हा दाखल आहे.

या प्रकरणात एकबोटे यांना अटक करण्यात आली आहे. ते न्यायालयीन कोठडीत आहेत. बचाव पक्षातर्फे ऍड. एस. के. जैन आणि ऍड. अमोल डांगे यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर 4 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)