मिलिंद एकबोटे यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना पोलीस कोठडी

पुणे- समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना पोलीस कोठडी पोलीस नेत असताना न्यायालयातच त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्या तिघांना 22 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी सचिन आगरवाल यांनी दिला आहे.
संजय हरिदास वाघमारे (वय 31, रा. अप्पर बिबवेवाडी), विठ्ठल अशोक खाडे (वय 23, रा. कात्रज) आणि अवदेश श्रीलालजी यादव (वय 27, रा. प्रियदर्शनी चाळ, अपर इंदिरानगर) अशी पोलीस कोठडी झालेल्यांची नावे आहेत. सोमवारी दुपारी 3.15 च्या सुमारास शिवाजीनगर न्यायालयात ही घटना घडली होती. अटक केलेल्यापैकी संजय हा सराईत आहे. त्याच्यावर शिवाजीनगर, बिबवेवाडी, स्वारगेट, वानवडी या पोलीस स्टेशनमध्ये खून, मारामारी, बनावट कागदपत्रे तयार करणे अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. शाई फेकल्याप्रकरणी त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघमारे हा गनिमा कावा युवा सेवा संघाचा संस्थापक अध्यक्ष आहे. यादव आणि खाडे हे दोघेही या संघटनेशी संबंधित आहेत. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी एकबोटे यांच्यावर शाई फेकण्याचा त्यांचा नक्की काय उद्देश होता, याच्या शोधासाठी तिघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील संजय दीक्षित यांनी केली. तर बचाव पक्षातर्फे ऍड. बी.ए.आलुर, ऍड. रणजित ढोमसे पाटील, ऍड. अंकुश जाधव यांनी काम पाहिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)