मिलिंद एकबोटे यांच्यावर शाईफेक केल्याप्रकरणात तिघांना जामीन

पुणे- समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यावर शिवाजीनगर न्यायालयात शाईफेक करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणातील तिघांना न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे. एक महिन्याच्या कालावधीत दुपारी 2 ते 4 या वेळेत शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावण्याच्या अटीवर तिघांना प्रत्येकी 15 हजार रुपयांचा जामीन सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पी.बी.गवारे यांनी मंजुर केला आहे.
संजय हरिदास वाघमोरे (वय 31, रा. अप्पर बिबवेवाडी) विठ्ठल अशोक खाडे (वय 23, रा. कात्रज) आणि अवदेश श्रीलालजी यादव (वय 27, रा. प्रियदर्शनी चाळ, अपर, इंदिरानगर) अशी जामीन झालेल्या तिघांची नावे आहेत. सोमवारी (दि. 19 मार्च) दुपारी 3.15 च्या सुमारास शिवाजीनगर न्यायालयात ही घटना घडली होती. शिरूर तालुक्‍यातील भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगल प्रकरणात पोलिसांनी एकबोटे यांना अटक केली आहे. न्यायालयने पोलीस कोठडीत वाढ केल्याने पोलीस एकबोटे यांना घेऊन चालले होते. त्यावेळी त्यांच्यावर शाईफेक करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यापैकी वाघमारे याला पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. तर खाडे आणि यादव या दोघांना गुरूवारीच न्यायालयीन कोठडी सुनावल्यात आली होती. तिघांच्य जामिनासाठी बचाव पक्षातर्फे ऍड. बी.ए.आलुर, ऍड. रणजित ढोमसे पाटील आणि ऍड. अकुश जाधव यांनी अर्ज केला होता. हा अर्ज मंजुर करत न्यायालयाने तिघांना जामीन मंजुर केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)