एकपात्री नाट्यप्रयोगातून अहिराणीचे दर्शन

पिंपरी – खान्देश सांस्कृतीक विकास संस्थेमार्फत प्रथम अहिराणी चित्रपट “सटीना टाक’ या चित्रपटाचे निर्माते स्व. दत्ताराम सखाराम चिंचोले यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या एकपात्री नाट्यप्रयोगाने रसिकांना अहिराणीचे दर्शन घडले.

निगडी-प्राधिकरणातील खान्देश मराठा मंडळाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे उद्‌घाटन उपमहापौर सचिन चिंचवडे यांच्या हस्ते झाले. यावेळी उद्योजक कुंदन ढाके, नगरसेवक नामदेव ढाके, पारस बाविस्कर, सामाजिक कार्यकर्त्या अंजली बाविस्कर, चित्रपटातील कलाकार रंजन खरोटे, खान्देश मित्र मंडळाचे अध्यक्ष हिरालाल पाटील, विजय पाटील, बी. डी. पाटील, मोतीलाल पाटील, गगनगिरी विश्व फाउंडेशनच्या अध्यक्षा रेखा भोळे, उद्योजिका मनिषा पाटील, उद्योजिका उज्ज्वला चौधरी आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संगीतकार श्‍याम क्षिरसागर यांनी “मोल’ चित्रपटातील “आम्ही मेंढर मेंढर’ हे अहिराणी भाषेतील गीत सादर करून प्रेक्षकांची दाद मिळविली. प्रवीण माळी यांनी सादर केलेल्या “आयतं पोयतं सरण्यानं’ या एकपात्री विनोदी नाट्याला रसिकांनी भरभरुन दाद दिली.

प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी केले. जितेंद्र चौधरी व भानुप्रिया पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेचे सचिव महेंद्र पाटील यांनी आभार मानले. किरण चौधरी, पी. आर. पाटील, भरत चित्ते, गणेश राजपूत, देवयाणी पाटील, राम पाटील, मोहन भोळे, शिवाजी पाटील, सचिन महाले, गौतम बागुल, दीपक कापडे, साहेबराव देसले, राहुल सोनवणे, किशोर पाटील, नितीन जाधव, जगन्नाथ पवार यांनी संयोजन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)