“एकनिष्ठेमुळे शिवसेनेने संधी दिली’

भवानीनगर- लहानपणापासून काटेवाडी गावात मामांच्या सानिध्यात घडत गेलो. त्यात गावातील सर्व तरुण मित्रांनी माझ्यावर खूप प्रेम केले. मीपण गेली 25 ते 30 वर्ष शिवसेनेचे एक निष्ठेने काम केले. त्याचीच दखल पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेऊन मला पुणे जिल्हा शिवसेनेचे अध्यक्ष केले. शिवसेना पक्षाचे केलेल्या कामाचे अध्यक्ष रूपाने मला फळ मिळाले, असे मत नवनिर्वाचित पुणे जिल्हाध्यक्ष शिवसेनेचे ऍड. राजेंद्र काळे यांनी व्यक्‍त केले. काटेवाडी (ता. बारामती) येथील पालखी ओटा येथे ऍड. राजेंद्र काळे यांच्या निवडीनिमित्त सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बारामती शिवसेना अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, सतीश काटे, सुभाष वाघ, संजय कोंडीबा काटे, दत्तात्रय काटे, अर्जुन काटे, पांडुरंग काटे, संजय काटे, राजू शहा, अविनाश कदम, स्वप्नील काटे, राजेंद्र साळुंके, गजानन रायते, अजित काटे, रमेश काटे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
काळे म्हणाले की, माझी शिवसेनेची सुरुवात काटेवाडी गावातून सुरु झाली. संघटन कौशल्य व भाषण करण्याची त्याकाळची जिद्द यामुळे मी घडत गेलो. सर्व शिवसैनिकांना बरोबर घेऊन शिवसेनेची सर्व तालुक्‍यात शाखा निर्माण करून तालुक्‍याच्या बाहेरही जाऊन शिवसेनेचे काम सतत करीत राहिलो. यापुढेही जोमात काम करून शिवसेनेचर ताकद वाढविण्याचे काम करणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)