एकनिष्ठांना शिवसेना कधीही डावलत नाही

नगर – शिवसेनेत कधीही घराणेशाही चालत नाही. एकनिष्ठांना शिवसेना कधीही डावलत नाही. सर्वसामान्य शिवसैनिकाला शिवसेनेने नेहमीच न्याय दिला आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यास आमदारकी व मंत्रिपदाच्या माध्यमातून काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या विचारांनी आम्ही प्रेरित असून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत काम करीत आहोत. शिवसेनेने उपनेतेपदी निवड करून पक्षाने माझ्या कामाची पावती दिली असल्याचे मी मानतो. असे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले.

केडगाव शिवसेनेच्या वतीने अनिल राठोड यांची शिवसेना उपनेतेपदी फेरनिवडीबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, विभागप्रमुख संग्राम कोतकर, युवा सेना शहरप्रमुख हर्षवर्धन कोतकर, युवराज कोतकर, नगरसेवक अनिल शिंदे, संतोष गेनाप्पा, संग्राम शेळके, रवी वाकळे, मदन आढाव, वसंत शिंदे, मुकेश गावडे, प्रमोद ठुबे, वसंत ठुबे, मंगेश शिंदे, डॉ. श्रीकांत चेमटे, रमेश परतानी, रावसाहेब भाकरे, वैभव गोरे, रूपेश शिंदे, भैय्या झरेकर, अनिकेत झरेकर, अक्षय उगलमुगले, नंदकिशोर ठुबे, प्रशांत भाले, योगेश गुंजाळ, सुशांत कोतकर, सागर गायकवाड, पिंटू मोढवे, ऋषिकेश कोतकर, संदेश शिंदे, किरण ठुबे, गौरव कार्ले, बबलू कोतकर, प्रतीक औताडे, ओंकार कोतकर, नीलेश गलढाले आदी उपस्थित होते.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)