एकदिवस सुवर्णपदक जिंकेलच – पी.व्ही. सिंधु 

नवी दिल्ली: गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही पीव्ही सिंधूला जगज्जेतेपदाने हुलकावणी दिली. गेल्यावर्षी सिंधूच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास ओकुहाराने हिरावला होता, तर यंदा मरिनने सिंधूवर वर्चस्व राखले. त्यामुळे उपान्त्यफेरीतच पराभव होत असलेल्या सिंधुच्या कामगीरीवर सर्वजण शंका उपस्थीत करु लागले आहेत. मात्र सिंधुने आपल्या कामगीरीचे समर्थन करताना सांगितले की, प्रत्येक जण जिंकण्यासाठीच खेळतो अन्‌ मीदेखील त्याच उद्देषाने खेळते. यंदाच्या रौप्यपदकाचादेखील आनंद आहेच. पुढील वेळेस चुका सुधारून सज्ज होईन आणि एक दिवस सुवर्णपदक जिंकेलच असा मला विश्‍वास आहे.
वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करण्याआधी सिंधूने नोझोमी ओकुहारा, अकेन यामागुची या जपानच्या आव्हानात्मक प्रतिस्पर्धी, तसेच कोरियाची संग जी ह्यून यांच्यासारख्या आशियाई प्रतिस्पर्ध्यांचा अडसर दूर केला होता. वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील कामगिरीबाबत सिंधूला आनंदच आहे. मुळात तिचा सहभाग आव्हानात्मक गटात झाला होता. यातून तावून-सुलाखून सिंधूने फायनलमध्ये धडक मारली होती. ‘रौप्यपदकाचा आनंदही मोठाच आहे. मी शंभर टक्के योगदान दिले. अर्थात जोपर्यंत सुवर्णपदक लाभत नाही, तोपर्यंत मला कठोर परिश्रम करावे लागतीलच. आशा आहे एकेदिवशी जागतिक सुवर्णपदकावर नाव कोरेनच’, असे सिंधूने पत्रकारांसोबत बोलताना सांगितले.
तसेच आगामी आशियायी स्पर्धाम्च्या दृष्टीने बोलताना ती म्हणाली की, एशियाडच्या निमित्ताने सरावासाठी फार कमी वेळ मिळाला असून त्याची खंत आहे तरी या स्पर्धेत विजेतेपद पटकाविण्याच्या प्रयत्नात मी असणार आहे. यावेळी पुढे बोलताना ती म्हणाली की, एशियाडच्या वैयक्तिक स्पर्धेतही मला नक्कीच सर्वोत्तम कामगिरी करायची आहे. खासकरून सलग दुसऱ्यांदा जागतिक रौप्यपदक पटकावल्यानंतर कामगिरीचा स्तर आणखी उंचावण्यावर मला भर द्यायचा आहे आणि स्पर्धेत सुवर्णपदक पटकवयाचे आहे.
वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करण्याआधी सिंधूने नोझोमी ओकुहारा, अकेन यामागुची या जपानच्या आव्हानात्मक प्रतिस्पर्धी, तसेच कोरियाची संग जी ह्यून यांच्यासारख्या आशियाई प्रतिस्पर्ध्यांचा अडसर दूर केला होता. त्यामुळे आशियायी स्पर्धांमध्ये त्यांच्या विरोधात खेळताना सिंधुला त्याचा फायदा नक्कीच होणार आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)