एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी वेस्ट इंडीज संघाची घोषणा 

ख्रिस गेलचा समावेश नाही, पोलार्ड-ब्राव्हो पुनरागमन करणार 
नवी दिल्ली: भारताविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतासारख्या मजबूत संघाविरुद्धच्या मालिकेसाठी वेस्ट इंडीजच्या निवड समितीने कमकूवत संघाची निवड केली आहे. संघात सुनिल नारायण, कायरन पोलार्ड आणि आंद्रे रसेल सारख्या खेळाडूंना स्थान देण्यात आले नाही. त्यातच आक्रमक खेळीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस गेलने भारतात येणार नसल्याचे म्हटले आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानेच ही माहिती दिली आहे.
 
भारताविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडीजच्या संघाला राजकोट कसोटीत डावाने पराभव स्विकारावा लागला. मालिकेतला दुसरा सामना 12 ऑक्‍टोबरपासून हैदराबादच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. मात्र आगामी एकदिवसीय व टी-20 मालिकेसाठी वेस्ट इंडिजने आपला संघ मैदानात उतरवला आहे. आज वेस्ट इंडीजच्या संघाची घोषणा करण्यात आली. 
या संघात वेस्ट इंडीजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलचा समावेश करण्यात आलेला नाही. तर, डॅरेन ब्राव्हो दोन वर्षांनंतर आणि कायरन पोलार्ड एका वर्षानंतर संघात पुनरागमन करणार आहे. यांच्यासह आंद्रे रसेलही संघात परतला आहे. दुखापतीमुळे रसेल एकदिवसीय मालिकेत खेळणार नसला तरी टी-20 मालिकेत तो संघात असणार आहे. फिरकीपटू सुनील नरीनही संघात जागा मिळवू शकला नाहीये. तर पुढील वर्षी होणारी विश्‍वचषक स्पर्धा डोळ्यासमोर ठेवताना विंडीजने संघात तीन नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्यामध्ये फलंदाज चंद्रपाल हेमराज, अष्टपैलू खेळाडू फॅबियन ऍलेन आणि वेगवान गोलंदाज ओशाने थॉमस यांचा समावेश आहे. 
एकदिवसीय मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ पुढीलप्रमाणे 
जेसन होल्डर (कर्णधार), फॅबिअन ऍलेन, सुनिल अँब्रिस, देवेंद्र बिशु, चंद्रपॉल हेमराज, शिमरॉन हेटमेयर, शाई होप, अल्झारी जोसेफ, एविन लुईस, ऍशले नर्स, किमो पॉल, रोवमन पॉवेल, केमार रोच, मार्लन सॅम्युअल्स, ओशने थॉमस. 
टी-20 मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ पुढीलप्रमाणे 
कार्लोस ब्रेथवेट (कर्णधार), फॅबिअन ऍलेन, डॅरेन ब्राव्हो, शिमरॉन हेटमेयर, एविन लुईस, ओबेड मॅकॉय, ऍशले नर्स, किमो पॉल, खारे पाईरे, कायरन पोलार्ड, रोवमन पॉवेल, दिनेश रामदिन, अँड्रे रसेल, शेरफन रुदरफोर्ड, ओशने थॉमस. 
What is your reaction?
60 :thumbsup:
6 :heart:
38 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)