एकत्र कुटुंब पद्धतीमुळे विचारांची जडणघडण – निकम

मंचर- एकत्र कुटूंब पद्धतीत जर कारभारी चांगला असेल तर कुटुंबाची आर्थिक प्रगती होते. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे विचारांची जडणघडण होते, असे प्रतिपादन मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी केले.
संत ज्ञानेश्‍वर देवस्थान आळंदी व वेदांत स्वाध्याय कमिटी यांच्या वतीने आदर्श कुटूंब प्रमुख म्हणून मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांचा सत्कार करण्यात आला. आळंदी येथे झालेल्या कार्यक्रम प्रसंगी या कार्यक्रमाचे संयोजक डॉ. नारायण जाधव, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सेवानिवृत्त सचिव के. के. निकम आदि उपस्थित होते. सभापती देवदत्त निकम यांचे नागापुर (ता. आंबेगाव) येथे गाव आहे. तेथे चार पिढया म्हणजे 100 वर्षे निकम कुटूंब एकत्र राहत आहेत. कुटुंबामध्ये 55 सदस्य आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)