एकत्रित निवडणुका-नवीन ईव्हीएम्ससाठी लागतील 4,555 कोटी रुपये

नवी दिल्ली – जर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घ्यायच्या असतील, तर नवीन ईव्हीएमसाठी सुमारे 4,555 कोटी रुपये लागणार असल्याची महिती विधी आयोगाने दिली आहे.

एकत्रित निवडणुकांसाठी सुमारे 10,60,000 मतदान केंद्रे उभारावी लागतील, असे निवडणूक आयोगाच्या हवाल्याने विधी आयोगाने म्हटले आहे. त्यासाठी आणखी 12.9 लाख बॅलेट युनिटस, 9.4 लाख कंट्रोल युनिट्‌स आणि सुमारे 12.3 लाख व्हीव्हीपॅट मशीन्सची गरज लागणार आहे. कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅटसह एका ईव्हीएमची किंमत 33,200 रुपये असते, त्यामुळे एकत्र निवडणूक घेतली, तर ईव्हीएम खरेदीसाठी सुमारे 4,555 कोटी रुपये खर्च येणार आहे.

एक ईव्हीएम साधारणपणे 15 वर्षे काम करू शकते. त्यामुळे 2024 साली दुसऱ्यांदा एकत्रित निवडणुकांसाठी 1751.17 कोटी आणि 2029 साली तिसऱ्यांदा एकत्रित निवडणुकांसाठी ईव्हीएम खरेदीसाठी 2017.93 कोटी रुपये खर्च येणार आहे. 2034 साली एकत्रित निवडणुकांसाठी ईव्हीएम खरेदीसाठी 13,981.58 कोटी रुपये खर्च येईल. एकत्र निवडणुका घेतल्यास प्रत्येक मतदान केंद्रासाठी ज्यादा ईव्हीएम आणि निवडणूक साहित्याखेरीज इतर काही अतिरिक्त खर्च येणार नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)