एकत्रितनिवडणुकांसाठी मोदी सरकारचे कायदा करण्याचे संकेत

नवी दिल्ली : देशातल्या सर्व निवडणुका एकत्रित घेण्यासाठी आग्रही असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट आता निवडणुकांसाठी कायदाच करण्याची भूमिका घेतली आहे.
संसदेत लवकरच विधेयक मांडले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. देशात एकत्रित निवडणुका घेण्यासाठी एनडीएतल्या घटक पक्षांना त्यांनी सहकार्य करण्यात आवाहन केले.  तसेच इतर पक्षांसोबतही सकारात्मक चर्चा करण्यावर भर देण्याचा आग्रह त्यांनी धरला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर महिनाभरातच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्यात, असेही मोदींनी नमूद केले. विरोधकांनी एकत्रित निवडणुकांना विरोध दर्शवला आहे. त्यामुळे सर्वसहमतीने हा निर्णय होत नसेल तर लोकसभेत बहुमताच्या जोरावर हे विधेयक पारित करण्याचे संकेतच आता मोदींनी दिले आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)