एकतेचा उत्सव…(प्रभात व Open House)

लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला गणेशोत्सव आज जगाच्या कानाकोपऱ्यात गेला आहे. टिळकांनी गणेशोत्सव लोकांना इंग्रजांविरुद्ध एकत्र संघटित करण्यासाठी सुरु केला .लोकही त्याप्रमाणे एकत्र आले ,लढले व शेवटी जिंकले.हे कशामुळे घडले तर एकतेमुळे.

उत्सव हा एकतेचा, सलोख्याचा, शांततेचा संदेश देतो. त्याप्रमाणे ह्या उत्सवाने सर्व जातीधर्मातील लोकांना एकत्र आणण्याचे काम केले. मी हा उत्सव पाहत मोठा झालो. पण इतर उत्सवापेक्षा यात खूप वेगळेपण आहे. यात सहभागी लोक, मंडळे दहा बारा दिवस समाज प्रबोधनाचे काम करतात ते मला छान वाटते. वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे आयोजित करणे, रुग्णांना कपडे देणे, आश्रमांना धान्य देणे यासारखी कामे करतात. शिवशाहीचे, विविध मंदिरांचे देखावे, बेटी बचाओ, बेटी पढाओ, अंधश्रद्धेविरुद्धचे देखावे दाखवून व्याख्याने ठेवून समाज प्रबोधन करतात. त्यात हे सर्व वातावरण भक्तिमय होऊन जातं.

बाप्पाच्या मूर्तीसमोर उच्च-नीच, गरीब-श्रीमंत असा भेद नसतो. या शांततेच्या कालात सर्व भक्त भक्तीत गढून  जातात. दररोज भक्तिभावाने गणेशाची आरती करणे, सर्वाना प्रसाद वाटणे खूप छान वाटते. या उत्सवातून समाजातील एकीचे दर्शन घडते. प्रत्येकजण बाप्पाकडे काहींना काही तरी मागत असतो.

आज इकोफ्रेंडली गणेशोत्सव  साजरा करण्याची गरज आहे. हे  पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. पाणी आणि हवा प्रदूषण  यापासून पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत होईल. हे सर्व आपल्या आरोग्याशी संबंधित असल्यामुळे इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा होणे काळाची गरज आहे.

– विशाल दाजी कदम, सोलापूर 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)