एकता कपूरचा पाठलाग केल्या प्रकरणी एकास अटक

मुंबई – प्रसिद्ध निर्माती-दिग्दर्शिका एकता कपूरचा पाठलाग केल्या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. सुधीर सिंग असे आरोपीचे नाव असून गेल्या महिन्याभरापासून तो एकताचा पाठलाग करत असल्याचे समोर आले आहे. सुधीर सिंग हा ३२ वर्षाचा असून तो टॅक्सी पुरवणाऱ्या एका खासगी कंपनीत कामाला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी एकता जुहू येथील मंदिरात गेली असताना मंदिराच्या आसपास सुधीर होता. त्याने एकताला भेटण्याचा प्रयत्न केल्यावर सुरक्षा रक्षकांनी त्याला थांबवले, तसेच एकतापासून लांब राहण्यासाठी सांगितले. पण तरीही त्याने एकताचा पाठलाग सुरुच ठेवला. एकता ज्या जिममध्ये जाते त्या जिमची मेंबरशिप देखील त्याने   घेतली होती. तिथेसुद्धा त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेव्हा देखील सुरक्षारक्षकांनी त्याला रोखले. अखेर या सगळ्या प्रकाराला वैतागून एकताने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पाठलाग करणाऱ्या या तरुणाला मुंबईतील अंबोली पोलिसांनी अटक केली असून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)