एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीला धमकी देणाऱ्याला सक्तमजुरी

पुणे- एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीला फोन, मॅसेज करणे, तसेच लग्न न केल्यास जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला न्यायालयाने तीन महिने सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश ए. एन. शिरसीकर यांनी हा आदेश दिला आहे.
कालेसाब उर्फ अमन बशीरसाब पिंजारी (वय 24, रा. होंन्डा शोरुमजवळ, खराडी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी 17 वर्षीय पीडित मुलीने विमानगर पोलिसांत फिर्याद दिली होती. ही घटना 18 ते 24 मे 2015 दरम्यान लोहगाव मधील खांडवेनगरमध्ये घडली. फिर्यादी मुलगी ही एका ज्वलर्स दुकानात कामाला आहे. 18 मे रोजी ती काम संपवून घरी चालली होती. त्यावेळी पिंजारी याने 15 मिनीट तुझ्याशी बोलायचे आहे, असे म्हणून तिला थांबवले. मी तूला गेल्या दिड महिन्यांपासून जाता – येता पाहत असून, माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे तो तिला म्हणाला. फिर्यादीचा नंबर घेतल्यानंतर त्याने तिला वारंवार फोन, मॅसेज केला. तर 24 मेला त्याने फिर्यादीला बोलावून घेत माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुझ्या नावाने चिठ्ठी लिहून मी मरेल अशी धमकी दिली. त्यावर पीडितेने माझे तुझ्यावर प्रेम नाही, असे स्पष्ट केले. त्यावेळी पिंजारी याने दोघांना चाकू मारेल किंवा गोळी घालीन अशी धमकी दिली होती. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील मोनिका निकम यांनी काम पाहिले. त्यांनी सहा साक्षीदार तपासले. पीडित मुलगी आणि तिच्या आईची साक्ष महत्त्वाची ठरली. पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया माने-रावडे यांनी या प्रकरणाचा तपास केला. पोलीस कर्मचारी एस. एन. बोंगाळे आणि एस. एस. जगताप यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
5 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)