एकतर्फी कायद्याच्या जोखडातून मुक्‍तता (भाग-२)

व्यभिचाराला गुन्ह्याच्या कक्षेत आणणारे भारतीय दंडसंहितेचे कलम 497 सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने रद्दबातल ठरविले आहे. ब्रिटिशांच्या शासनकाळात केलेल्या या कायद्यांतर्गत विवाहित महिलेशी संबंध ठेवणाऱ्या अविवाहित पुरुषावरच गुन्हा दाखल केला जात होता. बारकाईने पाहिल्यास जगभरात असा कायदा ज्या देशांत आहे, तिथे कुटुंबातील अपत्याचे रक्‍त शुद्ध राखण्याची मानसिकता पाहायला मिळते. महिलांना निवडीचा हक्‍क नाकारणारा हा कायदा गुंडाळल्यामुळे भारतीय राज्यघटनेतील समतेच्या तत्त्वाचे रक्षण झाले आहे.

एकतर्फी कायद्याच्या जोखडातून मुक्‍तता (भाग-१)

1860 पासून आतापर्यंत हाच कायदा लागू होता. परंतु भारतीय न्यायजगतातील प्रभावशाली विचारधारेने हा कायदा कायम ठेवावा अशीच भूमिका नेहमी घेतली. विधी आयोगाने 1971 मध्ये आपल्या 42 व्या अहवालात या कायद्यात दोन सुधारणा करण्याची शिफारस केली होती. पहिली म्हणजे, या गुन्ह्यातील शिक्षेची मुदत पाच वर्षांवरून दोन वर्षे करणे आणि दुसरी शिफारस महिलांनाही या गुन्ह्याच्या कक्षेत आणणे. परंतु या सूचना कधीच अंमलात आणल्या गेल्या नाहीत. हा कायदा समाप्त करण्याची वेळ अद्याप आलेली नाही, असे विधी आयोगाने म्हटले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केरळमधील व्यक्‍तीने दाखल केलेल्या याचिकेत व्यभिचाराला गुन्ह्याच्या कक्षेतून बाहेर काढण्याची मागणी करण्यात आली होती. दोन सज्ञान व्यक्तींमधील संबंध हा गुन्हा कसा ठरू शकतो, असा प्रश्‍न उपस्थित केला होता. तेव्हापासून हा कायदा समीक्षेच्या कक्षेत आला होता. पतीने तक्रार केली, तरच या कायद्यान्वये गुन्हा दाखल होत होता. हा अधिकार पत्नीला नव्हता. म्हणजेच, पतीने विवाहबाह्य संबंध ठेवल्यास तो व्यभिचार ठरत नव्हता. तसेच महिलेला आरोपी केले जात नव्हते. पत्नीने पतीच्या सहमतीने परपुरुषाशी संबंध ठेवले, तरी तो गुन्हा ठरविला जात नव्हता. याचाच अर्थ असे संबंध ठेवण्यासाठी पतीची परवानगी आवश्‍यक होती आणि त्यामुळे पत्नीवर जणू पतीची मालकी आहे का, असा प्रश्‍न उपस्थित होत होता. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, व्यभिचाराचा गुन्हा केवळ अविवाहित पुरुषावरच दाखल होऊ शकत होता. विवाहित पतीने व्यभिचार केल्यास तो गुन्ह्याच्या कक्षेत येत नव्हता. एखाद्या पुरुषाने अविवाहित महिलेशी संबंध ठेवले तरी तो व्यभिचार ठरत नव्हता.

अॅडल्टरी या इंग्रजी शब्दावरून व्यभिचार हा शब्द आलेला आहे. अॅडल्टरी या शब्दाचा अर्थच मुळात भेसळ असा आहे. रक्‍तात झालेल्या भेसळीशी त्याचा संबंध आहे. कायद्याची भाषाही महिलेवर पतीची मालकी असल्याप्रमाणे आहे आणि ती एक संपत्ती असल्यामुळे तिच्याशी संबंध ठेवण्याचा हक्‍क फक्‍त पतीला आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे, ब्रिटिशांच्या शासनकाळात भारतात व्यभिचाराचा कायदा झाला असला, तरी खुद्द ब्रिटनमध्ये व्यभिचार हा गुन्हा नाही. घटस्फोटासाठी ते सबळ कारण मानले गेले असले, तरी व्यभिचारासाठी शिक्षेची तरतूद ब्रिटनमध्ये नाही. अमेरिकेतील 21 राज्यांमध्ये व्यभिचार हा शिक्षापात्र गुन्हा आहे; परंतु दोन सज्ञान व्यक्‍तींमधील संबंध गुन्हा ठरू शकत नाही, असे निर्देश तेथील
सर्वोच्च न्यायालयाने दिल्यापासून व्यभिचाराच्या कलमाखाली अमेरिकेत कुणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. एकंदरीत, विकसित देशांत एक तर असा कायदाच नाही किंवा जिथे आहे, तिथे गुन्हे दाखल केले जात नाहीत, अशीच स्थिती आहे. अशा वेळी दीडशे वर्षांपूर्वीच्या ब्रिटिशकालीन कायद्याचे ओझे भारतात वागविले जाणे अनुचित होते. या पार्श्‍वभूमीवर, भारतीय दंडसंहितेचे कलम 497 रद्द करण्याचा घटनापीठाने दिलेला निर्णय उचित आणि स्वागतार्ह ठरतो.

– अॅड. अतुल रेंदाळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)