एअर इंडिया; हवेच्या दाबाने विंडो पॅनल पडल्यामुळे 3 प्रवासी जखमी

मुंबई : एअर इंडियाचे अमृतसर-दिल्ली विमान हवेत असतानाच एअर टर्ब्युलन्समुळे मोठा गोंधळ झाला. विमानातील खिडकीचे पॅनल खाली पडल्यामुळे प्रवासी घाबरले, तर डोक्याला दुखापत झाल्याने तीन प्रवासी जखमी झाले.

एअर इंडियाचे AI 462 हे बोईंग 787 ड्रीमलायनर विमान गुरुवारी अमृतसरहून दिल्लीला जात होते. त्यावेळी 10 ते 15 मिनिटे हवेच्या दाबामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. विमानाला काहीसे हादरे बसले. एका प्रवाशाने सीटबेल्ट न लावल्यामुळे त्याचे डोके लगेज केबिनवर आदळले. 18 ए सीटवरील विंडो पॅनल खाली पडले, मात्र खिडकीची काच शाबूत होती. मात्र विमानाला बसलेल्या हादऱ्यांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. ‘हाय लेव्हल टर्ब्युलन्समुळे ही परिस्थिती निर्माण झाली. एअर इंडिया आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय या प्रकरणाची चौकशी करत आहेत’ असे एअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)