एअर इंडियाला सरकारकडून मिळाली अत्यल्प मदत

नवी दिल्ली-आर्थिक अडचणींशी झुंजत असलेल्या एअर इंडियाला 2100 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ही मदत गॅरंटेड लोनच्या रूपात दिली जाईल. सार्वजनिक हवाई वाहतूक सचिव आरएन चौबे यांनी आज ही माहिती दिली. एअर इंडियावर 51 हजार कोटींच्या कर्जाचा बोजा असून, केंद्र सरकार सार्वजनिक उपक्रमातील ही कंपनी विक्री करण्याच्या प्रयत्नात आहे.

मे महिन्यामध्ये केंद्र सरकारने एअर इंडियामधील 76 टक्के भागीदारी विकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र एअर इंडियाच्या खरेदीसाठी कुणीही पुढाकार घेतला नाही. त्यानंतर सरकारने इक्विटी अन्फ्युजन योजना पुन्हा सुरू करावी, अशी विनंती एअर इंडियाकडून करण्यात आली होती. बेलआऊट पॅकेज अंतर्गत एअर इंडियाला आतापर्यंत 26 हजार कोटी रुपये मिळाले आहेत. 2012 साली तत्कालीन यूपीए सरकारने या पॅकेजची घोषणा केली होती. त्यानंतर आता ही मदत देण्यात येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)