एअर इंडियाबाबात कॅबीनेट निर्णय घेईल – सिन्हा

मुंबई, दि. 20- एअर इंडियाच्या सर्व बाजूवर आंतरमंत्रालयीन समितीने विचार केला आहे. आता या विषयावर कॅबीनेटच निर्णय घेईल असे नागरी विमान वाहतूक राज्य मंत्री जयंत सिन्हा यानी सांगीतले आहे.

या कंपनीवर 52 हजार कोटी रूपयाचे कर्ज आहे. या अगोदरच्या सरकारने या कंपनीला 30 हजार कोटी रूपयाची मदत केली आहे. आता या कंपनीच्या खासगीकरणासह सर्व विषयावर विचार केला जात असल्याचे त्यांनी सांगीतले.
आम्ही आमचे पर्याय कॅबीनेटकडे पाठविले आहेत. त्यावर कॅबीनेट काय तो निर्णय घेईल असे त्यांनी सांगीतले. निती आयोगाने तर या अगोदरच या कंपनीचे खासगीकरण करण्याचा सल्ला दिला आहे. तर अर्थमंत्री अरूण जेटली यांनी या अगोदरच या कंपनीचे खासगीकरण करण्याची गरज होती असे सांगीतले आहे.

मात्र काही कर्मचाऱ्यानी खासगीकरण करण्याला विरोध केला आहे. या कंपनीवर कर्ज बरेच आहे. मात्र कंपनीकडे मालमत्ताही खुप आहे. खासगीकरणामुळे ही मालमत्ता खरेदीदाराच्या घशात जाण्याची शक्‍यता असल्याचे कर्मचाऱ्याचे म्हणने आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)