एअर इंडियाने नाकारली मोदींच्या विदेश दौऱ्यांची माहिती

अशी माहिती न देण्याची पंतप्रधान कार्यालयाचीच सुचना

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एअर इंडियाचे विशेष विमान वापरून अनेक वेळा विदेश दौरे केले आहेत. त्या दौऱ्यांना आलेला खर्चाचा तपशील माहितीच्या अधिकारात त्या कंपनीकडे मागण्यात आला होता. पण एअर इंडियाने हा तपशील देण्यास नकार दिला आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या कारणावरून हा तपशील कोणालाही देऊ नये अशी सूचना पंतप्रधान कार्यालयाद्वारेच आम्हाला इमेलद्वारे देण्यात आली आहे त्यामुळे आम्ही ही माहिती देऊ शकत नाही असे एअर इंडियाने अर्जदाराला कळवले आहे. त्या अर्जदाराला एअर इंडियाने पंतप्रधान कार्यालयाकडून त्यांना आलेला ईमेलही पाठवला आहे.

निवृत्त कमोडोर लोकेश बात्रा यांनी 2 फेब्रवारी रोजी एअर इंडियाकडे माहितीच्या अधिकारात हीं माहिती मागवली होती. पंतप्रधानांच्या दौऱ्याची विमान खर्चाची बिले एअर इंडियाने नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि विदेश मंत्रालयाकडे पाठवली आहेत. ही बिले कोणत्या तारखेला तयार केली आहेत त्याची माहिती त्यांनी मागवली होती पण त्यांना ती नाकारण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्याविषयीची कोणतीही माहिती माहितीच्या अधिकारात देण्यात येऊ नये अशी सुचना पतंप्रधान कार्यालयाकडून सन 2016 मध्येच करण्यात आली होती. एअर इंडियाने पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्यासाठी विशेष विमान सेवा दिली परंतु त्यांची बिले त्यांना अजून देण्यात आलेली नाहीत. एअर इंडिया ही कंपनी तोट्यात चालेली असताना त्यांची ही बिले का थकवली जात आहेत याची चौकशी करण्यासाठी बात्रा प्रयत्नशील आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)