एअर इंडियात 76 टक्के निर्गुंतवणूक करणार

File photo

नवी दिल्ली – एअर इंडियामधील 76 टक्के समभागांची विक्री करण्याचे सरकारने ठरवले आहे. याबबतची प्राथमिक माहिती आज जाहीर करण्यात आली. सातत्याने तोट्यात असलेल्या एअर इंडिया आणि अन्य दोन संबंधित कंपन्यांमधील गुंतवणूक काढून घेण्याच्या निर्णयावर नागरी विमान वाहतुक मंत्रालयाने अभिप्राय मागवले आहेत.

एअर इंडियातील 76 टक्के समभागांची विक्री आणि व्यवस्थापकीय नियंत्रणामध्ये बदल करण्याचा ठराव मंत्राल्याने केल्याचे म्हटले आहे. या निर्गुंतवणूक प्रक्रियेतील सल्लागार म्हणून एम्स्ट ऍन्ड यंग एलएलपी इंडिया या कंपनीची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

एअर इंडियावर सुमारे 50 हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीने एअर इंडियामध्ये निर्गुंतवणूक करण्यास तत्वतः मंजूरी दिली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)