एअर इंडियाच्या विमानाचे हवेत तुटले पॅनल

 तीन प्रवाशी जखमी; सुदैवाने विमानातील 240 प्रवाशी बचावले

नवी दिल्ली – अमृतसरवरून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात अचानक मोठा गोंधळ उडाला. उड्डाण केल्यानंतर हवेतच असताना खिडकीचे पॅनल अचानक तुटल्याने विमानातील 3 प्रवासी जखमी झाले. सुदैवाने मोठी दुर्घटना न झाल्याने विमानातील 240 प्रवाशांचे जीव वाचले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, AI 462मध्ये अचानक झटका बसल्याने एका प्रवाशाच्या (18-अ) डोक्‍यावर खिडकीचे पॅनल पडले. यात आणखी दोन प्रवासीही जखमी झाले. प्रवाशांनी कदाचित सीट बेल्ट बांधला नव्हता. त्यामुळे विमानाच्या आतील खिडकीचे पॅनल पडले. सुदैवाने बाहेरची खिडकी तुटली नाही. परंतु, या प्रकारामुळे प्रवासांमध्ये एकच गोंधळ निर्माण झाला. तसेच विमानातील ऑक्‍सिजन मास्कही बाहेर आले. आसन क्रमांक 12 यू वरील पॅनल कव्हरलाही तडे गेल्याचे दिसून आले. हा खूप विचित्र अपघात आहे. एअर इंडिया आणि डीजीसीए याचा तपास करत असल्याची माहिती एअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

विमान दिल्लीला लॅंड करताच जखमी असलेल्या तिन्ही प्रवाशांना रूग्णालयात नेण्यात आले. आमच्या आपात्कालीन पथकाने जखमींची पुरेपूर काळजी घेत रूग्णालयात पोहोचवले. ज्या प्रवाशाच्या डोक्‍यावर पॅनल पडले त्यांना थोडी गंभीर दुखापत झाली आहे तर इतर दोघांची काळजी करण्यासारखी स्थिती नव्हती. प्राथमिक उपचारानंतर त्यांना संलग्नित विमानाने पुढे पाठवण्यात आले, एअर इंडियाच्या एक वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. डीजीसीएने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून एअरक्राफ्ट ऍक्‍सिडेंट इन्वेस्टिगेशन बोर्डला याची माहिती देण्यात आली आहे.दरम्यान, या घटनेचा 50 सेकंदाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात एअर होस्टेज तुटलेला खिडकीचा पॅनल बसविण्याचा प्रयत्न करताना दिसते. तर शेजारी एक वृद्ध महिला अन्य प्रवाशांना शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करताना दिसते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)