एअर इंडियाच्या विक्रीबाबत लवकरच निर्णय – जेटली

नवी दिल्ली – एअर इंडिया हीं सरकारी विमान कंपनी खासगी क्षेत्राला विकण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल अशी महिती अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज येथे दिली. किमान दोन कंपन्यांनी एअर इंडिया विकत घेण्याची तयारी दर्शवली आहे.

गेले अनेक वर्षे एअर इंडिया तोट्यात चालली आहे. त्याच्या निर्गुंतवणुकीचा तपशील निश्‍चीत करण्यासाठी अरूण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री गट काम करीत आहे. हा निर्णय लवकरच घेतला जाईल अशी माहिती जेटली यांनी आज पत्रकारांना दिली. गेल्या जून महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीला तत्वता मान्यता देण्यात आली आहे. इंडिगो आणि बर्ड ग्रुप या दोन कंपन्यांनी हीं कंपनी विकत घेण्याची तयारी दर्शवली असून तसा लेखी प्रस्ताव त्यांनी सरकारला पाठवला आहे.

एअर इंडियावर सध्या 52 हजार कोटी रूपयांचे कर्ज आहे. या कंपनीला मागील युपीए सरकारने30 हजार कोटी रूपयांचे बेलआऊट पॅकेज जाहीर केले होते त्यावर हीं कंपनी तगून आहे. पण एअर इंडिया तोट्यात चालवणे म्हणजे करदात्यांचा पैसा नाहक वाया घालवण्यासारखे असल्याने त्या कंपनीचे पुर्ण खासगीकरण करण्याची सुचना नीती आयोगाने या आधीच सरकारला केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)