एअर इंडियाच्या निर्णयाविरुद्ध आज एजंटांचे आंदोलन

पुणे – विमान तिकीट आरक्षण प्रक्रियेतून एजंटांना बाद करत बुकिंगसाठी एकवेळ एकाच संस्थेला तिकीट आरक्षित करण्याचा अधिकार देण्याचा विचार एअर इंडिया कंपनी करत आहे. मात्र, तिकिटांचे बुकिंग करण्यासाठी अधिकृत एजंट्‌सचा मोठा वाटा असून यामुळे सध्याचे वितरक आरक्षण प्रक्रियेतून बाहेर होणार आहेत. यामुळे देशाच्या हवाई उड्डाण कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याने या निर्णयविरोधात एजंट आंदोलन करणार आहेत.

आज (दि.14) शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोरील (आरटीओ) एअर इंडियाच्या कार्यालयाजवळ एजंट्‌स संघटनांचे प्रतिनिधी आंदोलन करणार आहेत. सध्याची तिकीट वितरण प्रणाली ही जागतिक पातळीवर स्वीकारली गेली आहे. या माध्यमातूनच विविध विमान कंपन्यांच्या तिकिटांचे आरक्षण केले जाते. मात्र, 2019 पासून सध्याची तिकीट आरक्षण पद्धती बंद करण्याचा निर्णय एअर इंडियाने घेतला आहे. दरम्यान, देशाची हवाई वाहतूक सेवा वाचविण्याच्या उद्देशाने विविध ट्रॅव्हल एजंट्‌स आंदोलनात सहभागी होत आहेत. ट्रॅव्हल एजंट्‌स असोसिएशन ऑफ पुणे, ट्रॅव्हल एजंट्‌स फेडरेशन, एंटरप्राईजिंग ट्रॅव्हल एजंट्‌स असोसिएशन-वेस्टर्न इंडियाचे प्रतिनिधी यात सहभागी होणार असल्याची माहिती एजंट्‌स संघटनेकडून देण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)