एअर इंडियाचे विमान सौदीवरून प्रथमच थेट पोहोचले इस्त्रायलला

File photo

तेलअवीव्ह – एअर इंडिया या भारतीय विमान कंपनीचे विमान आज सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीतून थेट इस्त्रायलला पोहचले. या विमानाची ही ऐतिहासिक कामगीरी आहे. सौदी अरेबियाने आज पर्यंत इस्त्रायलकडे जाणाऱ्या कोणत्याच देशाच्या विमानाला आपल्या हवाई हद्दीचा वापर करू दिला नव्हता. पण सौदीने एअर इंडियाला प्रथमच अशी परवानगी दिली असून त्याआधारे एअर इंडियाचे पहिले विमान आज दिल्ली वरून तेलअव्हीवला पोहचले.

हा खरोखरच एक ऐतिहासिक क्षण आहे, त्यातून नव्या युगाला प्रारंभ होणार आहे. ही थेट विमान सेवा सुरू झाल्याने अनेक भारतीय पर्यटक इस्त्रायलला येऊ शकतील असे त्या देशाचे पर्यटन मंत्री यारी लेव्हीन यांनी म्हटले आहे. दोन देशांतील या थेट विमान सेवेमुळे भारत आणि इस्त्रायल यांच्यातील संबंध आणखी दृढ होतील असेही त्यांनी म्हटले आहे.
भारतीय विमानाला सौदीच्या हवाई हद्दीवरून जाण्यास अनुमती दिल्याने विमान प्रवासाचा कालावधी 2 तास 10 मिनीटांनी कमी झाला आहे. त्यामुळे दिल्लीहून हे विमान इस्त्रायलची राजधानी तेलअव्हीवला केवळ 7 तास 15 मिनीटांत पोहचू शकते.

सौदी अरेबिया विषयी बोलताना यारी लेव्हीन यांनी सांगितले की या विषयी सावगिरीच बाळगायला हवी. तथापी त्यांचे हे पहिले पाऊल महत्वाचे आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आमच्या शेजाऱ्यांशी आमचे अधिक चांगले होतील अशी अपेक्षा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)