एअरसेल प्रमोटरविरोधात सीबीआयकडून प्रकरण दाखल

नवी दिल्ली – एअरसेल कंपनीचे माजी प्रमोटर सी. शिवशंकरनच्या दोन कंपन्या, सिंडीकेट आणि इंडियन बॅंकेच्या दोन व्यवस्थापकीय संचालकांविरोधात सीबीआयने आयडीबीआय बॅंकेचे 600 कोटी रुपयांचे कर्जबुडवल्याचे प्रकरण दाखल केले आहे. शिवशंकरन यांच्या कंपनीने फेब्रुवारी 2014 मध्ये 530 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जाची वेळेवर परतफेड न केल्यामुळे ही रक्कम 600 कोटी रुपयांपर्यंत वाढ गेली होती, असे आयडीबीआय बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

आयडीबीआय बॅंकेचे माजी सीएमडी, इंडियन बॅंकेचे विद्यमान एमडी आणि सीईओ किशोर खरात आणि सिंडीकेट बॅंकेचे एमडी आणि सीईओ मेलविन रेगो (आयडीबीआय बॅंकेचे तत्कालिन डेप्युटी एमडी) यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी सीबीआयने दिल्ली, फरिदाबाद, मुंबई, गांधीनगर, चेन्नई, बेंगळूरु, बेळगाव, हैदराबाद, जयपूर आणि पुणे आदी 50 ठिकाणी छापेही घातले. यामध्ये आयडीबीआय बॅंकेच्या माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांचाही समावेश आहे.

गुन्हेगारी कारस्थान, फसवणूक, भ्रष्टाचार आदी आरोपांखाली एअरसेल सनशाईन लिमिटेडविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आयडीबीआय बॅंकेचे 15 वरिष्ठ आणि काही निवृत्त अधिकारी आणि 24 खासगी व्यक्‍ती, अन्य कंपन्यांचे संचालक आणि अध्यक्षांविरोधात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)