एअरसेलकडून 168 जीबी डेटा,अनलिमिटेड कॉलिंगचा नवा प्लान

मुंबई : रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आता एअरसेलने  419 रुपये आणि 299 रुपये असे दोन प्लॅन लाँच केले आहेत. 419 च्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 84 दिवसांसाठी तब्बल 168 जीबी डेटा मिळणार आहे. म्हणजेच दररोज 2 जीबी डेटा. तसेच अनलिमिटेड कॉलिंगही यामध्ये देण्यात आले आहे.
419 रुपयांचा एअरसेलचा हा नवा प्लॅन पूर्वोत्तर राज्यांसाठी असणार आहे. मात्र, जम्मू-काश्मीरमध्ये या प्लॅनची किंमत 499 रुपये आहे. या प्लॅनमध्ये ग्राहक कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल करु शकतात. पण यावर मिळणारा डेटा 2 जी आणि 3 जी असणार आहे. तर एअरसेलने 299 रुपये किंमतीचा दुसरा प्लॅन देखील लाँच केला आहे. यामध्ये 84 दिवसांसाठी 84 जीबी डेटा म्हणजेच दररोज 1 जीबी डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये फक्त एअरसेल नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)