पणजी -एअरटेलने महाराष्ट्र आणि गोव्यातील 4जी स्मार्टफोन ग्राहकांसाठी सुधारित मोबाइल नेटवर्क उपलब्ध करून दिले आहे. या नेटवर्कमुळे ग्राहक आता आवाजाचा दर्जा आणि डेटाचा अनुभव घेऊ शकणार आहेत. नेटवर्कच्या आवाजाची गुणवत्ता वाढवण्यासाठी कंपनीने त्यांचे 3जी नेटवर्क ऑप्टीमाइज केले आहे.

डेटा विभागात एअरटेलने त्यांच्या 4जी क्षमतेमध्ये वाढ केली आहे. यामुळे ग्राहक अखंडपणे हाय स्पीड डेटा मिळणार आहे. कंपनीचे महाराष्ट्र आणि गोव्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित मारवाह यांनी सांगितले की, आता करण्यात आलेल्या ऑप्टीमायजेशनमुळे आमचे ग्राहक सर्वोत्तम आवाज गुणवत्तेचा अनुभव घेऊ शकतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)