एअरटेलविरुद्ध बीएसएनएलची वीज चोरीची तक्रार

श्रीनगर (जम्मू-काश्‍मीर) – जम्मू-कश्‍मीरच्या एअरटेल या टेलिकॉम कंपनीच्या विरोधात वीजचोरीची तक्रार नोंदवण्यात आली आहे. कारगील जिल्ह्यात केवळ बीएसएनएलसाठी असलेल्या ट्रान्स्फॉर्मरमधून बेकायदेशीर वीजपुरवठा घेतल्याबद्दल 3 ऑगस्ट रोजी बीएसएनएलने कारगील पोलीस ठाण्यावर लेखी तक्रार नोंदवली आहे.

कारगीलमधील चानीगुंड येथील बीएसएनएलसाठीच असलेल्या ट्रान्सफॉर्मरमधून टॅपिंग करून एअरटेलने वीजवीज चोरी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. कारगीलचे एसएसपी टी ग्यालपो यांनी कारगीलचे डीवायएसपी इश्‍तियाक ए काचो यांच्या नेत्रृत्वाखाली आणि आणि पीडीडी कारगीलचे कार्यकारी अभियंता मोहम्मद अल्ताफ यांचा समावेश असलेली टीम तपासासाठी पाठवली. एअरटेलचा टॉवर केबलने बीएसएनएलच्या टॉवरशी बेकायदेशीरपणे जोडल्याचे टीमला आढळून आल्याचे प्रवक्‍त्याने सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विद्युत कायद्याच्या कलम 95 खाली एअरटेलविरोधात केस दाखल करण्यात आलेली आहे. दरम्यान बीएसएनएलच्या ट्रान्स्फॉर्मरशी जोडलेला टॉवर आपला नसल्याचा खुलासा एअरटेलच्या प्रवक्‍त्याने केला आहे. संबधित टॉवर हा भारती ग्रुपची कंपनी असलेल्या इन्फ्रा टेलचा असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. खातरजमा न करता आमचे नाव या प्रकरणात गोवल्याबद्दल त्यांनी आश्‍चर्य व्यक्त करून याबाबत बीएसएनएलबरोबर चर्चा करून सर्व स्पष्टीकरण करणार असल्याची माहिती प्रवक्‍त्याने दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)