एअरइंडियाच्या उपकंपनीची निर्गुंतवणूक

नवी दिल्ली: एअरइंडियाची उपकंपनी असणाऱ्या एअरइंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसची विक्री करण्याची तयारी सरकारकडून करण्यात येत आहे. या विक्रीने कर्जाचे ओझे कमी करण्यास मदत होणार आहे. ही कंपनी विमानतळावरील सेवा देण्याचे काम करते. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील समितीने जूनमध्ये एअरइंडियाला अधिक स्पर्धात्मक करणे आवश्‍यक असल्याचे म्हटले होते.

यासाठी स्थावर संपत्ती आणि अन्य उपकंपन्यांचा लिलाव करण्याचा प्रस्ताव मांडला होता. या वर्षाच्या सुरुवातीला एअरइंडियातील 76 टक्‍के हिस्सा विक्रीसाठी पुकारण्यात आलेल्या लिलावाला कोणीही बोली न लावल्याने यासंदर्भात पुन्हा विचार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2016-17 च्या आकडेवारीनुसार एआयएटीएसएल आणि एअरइंडिया एक्‍स्प्रेस लिमिटेड या दोन्ही उपकंपन्या नफ्यात आहेत. या दोन्ही कंपन्यांना अनुक्रमे 61.66 कोटी आणि 2.97 अब्ज रुपयांचा नफा झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)