एअरइंडियाची मालकी भारतीयाकडेच राहील

File photo

नवी दिल्ली – लवकरच खासगीकरण होणार असलेल्या एअरइंडियाचा 49 टक्‍के मालकीहक्‍क विकत घ्यायला विदेशी कंपनीने तयारी दाखवली आहे. मात्र, तरी कंपनीची मालकी भारतीयाकडेच राहणार आहे. असे नागरी उड्डयन सचिव आर. एन. चौधरी यांनी सांगितले. परंतु एअरइंडियाच्या निर्गुंतवणुकीबाबत ज्या विदेशी कंपन्यांनी रस दाखवला आहे त्यात सिंगापूर एअरलाईन्सचा समावेश आहे. भारतात विमानसेवा देण्याची इच्छा देण्यास कतार एअरवेज ही आणखी एक मोठी विदेशी कंपनी उत्सुक आहे.

कातार एअरवेजला फार पूर्वीच इंडिगोमध्ये हिस्सा घ्यायचा होता. इंडिगोने एअरइंडियाच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांत व एअरइंडिया एक्‍स्प्रेसमध्ये औपचारिकरित्या उत्सुकता दाखवली होती. या क्षणाला ती विदेशी कंपनी किंवा इतर कोणती कंपनी इच्छुक आहे हे सांगणे शक्‍य नाही. या क्षणी त्या कंपन्यांना त्यांची नावे जाहीर करणे मान्य आहे का हे तपासून घ्यावे लागेल, असे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. एअरइंडियात विदेशी कंपन्यांना 49 टक्‍क्‍यांपर्यंत गुंतवणूक करण्यास सरकारने गेल्या महिन्यात परवानगी दिली होती त्यामुळे भारतीय कंपन्यांना विदेशी कंपन्यांसोबत करार करून बोली लावण्याचा मार्ग मोकळा करून दिला गेला. एअर इंडियात 49 टक्‍क्‍यांपर्यंत गुंतवणूक करण्यास विदेशी विमान कंपन्यांना परवानगी आहे.

एअरइंडियाची मालकी ही भारतीय नागरिकाकडेच राहील. एअर इंडियामध्ये विदेशी विमान कंपन्यांसह थेट किंवा अप्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक ही 49 टक्‍क्‍यांच्या वर असणार नाही, असे दहा जानेवारीच्या निवेदनात म्हटले. या निर्णयामुळे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात थेट विदेशी गुंतवणुकीच्या जाहीर धोरणामुळे निर्माण झालेला संभ्रम दूर झाला आहे. त्या धोरणात म्हटले होते की विदेशी विमान कंपन्या भारतीय विमान कंपन्यांत 49 टक्‍क्‍यांपर्यंत मालकी घेऊ शकतात परंतु यातून एअर इंडियाला वगळले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)