ऍलन कॅस्टेलिनो मेमोरीयल व्होबा करंडक स्पर्धा : फिनाक्‍यु गोग एफसी, पुणे वॉरीयर्स एफसी संघांचा अंतिम फेरीत प्रवेश ! 

पुणे: फिनाक्‍यु गोग एफसी आणि पुणे वॉरीयर्स एफसी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करताना व्हिन्सेन्टस्‌ ओल्ड बॉईज असोसिएशन (व्होबा) तर्फे आयोजित ऍलन कॅस्टेलिनो मेमोरीयल व्होबा करंडक निमंत्रित फुटबॉल स्पर्धेत व्दितीय आणि तृतीय श्रेणी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

कॅंपमधील सेंट व्हिन्सेन्ट हायस्कूल आणि ढोबरवाडीच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या व्दितीय व तृतीय श्रेणीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात फिनाक्‍यु गोग एफसी संघाने सुखाई एफसी संघाचा 4-0 असा एकतर्फी पराभव करून स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. फिनाक्‍युच्या श्रीकांत एम. याने 9 व्या मिनिटाला गोल करून संघाचे खाते उघडताना संघाला 1-0 अशी आघाडी मिलवून दिली. त्यानंतर प्रकाश थोरात याने 10 मिनिटांच्या अंतराने दोन गोल करून संघाची ही आघाडी 3-0 अशी वाढवली. उत्तरार्धात सुरज थापा याने 59 व्या मिनिटाला गोल करून संघाला सहज मिळवून दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात शंतनु कांदीवे याने केलेल्या दोन गोलांच्या जोरावर पुणेरी वॉरीयर्स एफसी संघाने नॉईझी बॉईज संघाचा 3-2 असा पराभव केला. अतियश चुरशीने लढल्या गेलेल्या या सामन्यात विवेक घेइनंद याने सहाव्या मिनिटाला पहिला गोल केला. नॉईझी बॉईजच्या हर्षल गायकवाड याने 15व्या मिनिटाला गोल करून संघाला बरोबरी गाठून दिली. त्यानंतर शंतनु कांदीवे याने तीन मिनिटांमध्ये दोन गोल करून पुणेरी संघाला 3-1 अशी निर्णायक आघाडी मिळवून दिली. तसेच, अव्वल आणि प्रथम श्रेणीच्या उप-उपांत्यपुर्व फेरीच्या सामन्यात डिएगो एफसी संघाने शिवाजीयन्स्‌ एससी संघाचा 3-1 असा सहज पराभव करून उपांत्यपुर्व फेरी गाठली. या गटाच्या उपांत्यपुर्व फेरीच्या सामन्यात मोनिस एस. याने केलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर आयफा स्काय हॉक्‍स्‌ संघाने कमांडोज्‌ एफसी अ संघाचा 1-0 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.

सविस्तर निकाल ः
अव्वल आणि प्रथम श्रेणी ः उप-उपांत्यपुर्व फेरी – डिएगो एफसीः 3 (ग्लेन रिबेलो, बेवाह घोरूप्पा, सौरभ कृष्णन) टायब्रेकमध्ये वि.वि. शिवाजीयन्स्‌ एससीः 1 (बिस्वव्दिप मोंडल);(गोल चुकविलेः कोकू लिंग्गी, हळदणकर मोनाउट, सागर गरड); पूर्ण वेळ 0-0, उपांत्यपुर्व फेरीः आयफा स्काय हॉक्‍सः 1 (मोनिस एस. 31 मि.) वि.वि. कमांडोज्‌ एफसी अः 0,
व्दितीय आणि तृतीय श्रेणी गटः उपांत्य फेरीः फिनाक्‍यु गोग एफसीः 4 (श्रीकांत एम. 9 मि., प्रकाश थोरात 20, 30 मि., सुरज थापा 59 मि.) वि.वि. सुखाई एफसीः 0, पुणेरी वॉरीयर्स एफसीः 3 (विवेक घेइनंद 6 मि., शंतनु कांदीवे 20, 22 मि.) वि.वि. नॉईझी बॉईजः 2 (हर्षल गायकवाड 15 मि., प्रतिक संधल 40 मि.).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)