ऍरिझोन विमान अपघातात भारतीय-अमेरिकन उद्योजकाचा मृत्यू

वॉशिंग़्टन (अमेरिका) – ऍरिझोन येथे झालेल्या विमान अपघातात एक तरुण भारतीय उद्योजक मरण पावल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पायपर पीए24 कोमान्च विमान जवळच्या एका विमानतळावरून लास वेगासला जात होते. मात्र उड्डाण केल्यानंतर 15 मिनिटातच ते ऍरिझोनाच्या फिनीक्‍स या उपनगरातील स्कॉट्‌सडेल गोल्फ मैदानात कोसळले. विमान कोसळल्याची माहिती स्कॉट्‌सडेल पोलीस खात्याचे प्रवक्ते केवीन वॅट्‌स यांनी दिली आहे. कोसळताच विमानाने पेट घेतला आणि विमानात असलेले सहाही प्रवासी या अपघातात मरण पावल्याचे त्यांनी सांगितले. हे सर्व प्रवासी तरुण असून 22 ते 28 या वयोगटातील होते.

अपघातात मरण पावलेल्या भारतीय-अमेरिकन उद्योजकाचे नाव आनंद पटेल असून “व्हाट्‌स हॅपी क्‍लोदिंग’ चा तो संस्थापक होता. आपल्या मित्रपरिवारात तो हॅपी नावाने प्रसिद्ध होता. 2009 साली शिक्षणासाठी आपल्या जुळ्या भावाबरोबर अमेरिकेत आलेल्या आनंदने वस्त्रांच्या व्यवसायात पदार्पण केले. त्याने स्वत:चा ब्रॅंड सुरू केला. इव्हेंट प्रमोटर म्हणूनही तो काम करत असे. तो नेहमीच मित्रमंडळी आणि व्यावसायिकांबरोबर विमानप्रवास करत असे आणि अनेकदा स्कॉट्‌सडेल येथे येत असे. या अपघाताचा तपास फेडरल ऍव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशनच्या सहकार्याने नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड करत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)