ऍमेझॉनच्या पार्सलमधील 232 मोबाईल चोरणाऱ्याच्या पोलीस कोठडीत वाढ

पुणे – अमेझॉन कंपनीच्या विमानाद्वारे अर्जंट आलेल्या पार्सलमलील दहा महिन्याच्या कालावधीत 51 लाख 11 हजार 195 रुपये किंमतीचे 232 मोबाईल हॅंडसेट चोरणाऱ्या कामगाराच्या पोलीस कोठडीत 1 फेब्रुवारीपर्यंत वाढ करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

सुरज सुरेश कदम (वय 25, रा. भैरवनगर, धानोरी रस्ता) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. याबाबत प्रणव गोपाळ बोराळे यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 5 एप्रिल ते 29 ऑक्‍टोबर 2017 या कालावधीत घडला. कदम हा अमेझॉन ट्रांसपोर्टेशन सर्व्हिसेस प्रा.लि. कंपनीत कामाला होता. ऑनलाईन खरेदी झाल्यानंतर मोबाईल हॅंडसेट विमानाद्वारे पाठविले जायचे. त्या आलेल्या प्रत्येक पार्सलपैकी 2 ते 3 हॅंडसेत कदम चोरायचा. कमी किंमतीत दुसऱ्या ग्राहकांना विकत असल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने विमानतळ पोलिसांनी कदम याला न्यायालयात हजर केले.

-Ads-

त्यावेळी त्याच्याकडून चोरी केलेल्यापैकी 6 लाख 81 हजार 200 रुपये किंमतीचे 40 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. उर्वरित मोबाईल हस्तगत करण्यासाठी, त्याचे आणखी कोण साथीदार आहेत का, याच्या शोधासाठी त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी सहायक सरकारी वकील वामन कोळी यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत वाढ केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)