ऍमी जॅकसनचा फोन झाला ‘हॅक’

 

ऍमी जॅक्‍सन सहसा कामाव्यतिरिक्‍त अन्य कारणांमुळे चर्चेत असत नाही. पण ती चर्चेत आली आणि तिने चक्क मुंबई पोलिसांकडे एक तक्रारही दाखल केली आहे. त्याला कारणही तसेच आहे. ऍमीचा मोबाइल चक्क “हॅक’ झाला. तिच्या मोबाइलमधील खासगी फोटो लीक झाले आणि ते चक्क इंटरनेटवर प्रसिद्धही झाले. या प्रकारामुळे ऍमी अगदी वैतागली. तिने लंडन आणि मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईम सेलकडे याबाबत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता.
रजनीकांत आणि अक्षयकुमारच्या “2.0’च्या शुटिंगसाठी तिला चेन्नईला जायचे होते. विमान बदलण्यासाठी ती मुंबईला थांबली आणि एका मोबाइल स्टोअरमध्ये गेली. तेथेच तिचा मोबाइल हॅक झाला आणि त्यातले सगळे फोटो एका “क्‍लाऊड स्टोअरेज’मध्ये सेव्ह व्हायला सुरुवात झाली. नंतर जेव्हा ऍमी लंडनला गेली तेव्हा आपल्या मोबाइलमधल्या त्या खास फोटोंचा तिचा संपर्क तुटल्याचे तिच्या लक्षात आले. हे फोटो नंतर एका सोशल मीडियावर एक एक करून झळकायला लागल्याचे तिच्या लक्षात आले. अशा प्रकारे मोबाइल हॅकिंगचा फटका यापूर्वी करिना कपूरलाही बसला होता. त्या प्रकरणी मुंबईतल्याच एकाला पोलिसांनी अटकही केली होती.
ऍमीच्या “2.0’मध्ये रजनीकांत मध्यवर्ती भूमिका साकारत असणार हे उघड आहे, मात्र, गंमतीचा भाग म्हणजे यामध्ये अक्षय चक्‍क व्हिलन साकारतो आहे. दोनच दिवसांमध्ये ऍमीचे “2.0’मधले शुटिंग संपले आणि ती पुन्हा लंडनला रवाना झाली. हा सिनेमा पहिल्यांदा तामिळमध्ये बनवला जाणार आहे, त्यानंतर इतर अन्य भाषांमध्ये त्याचे डबिंग केले जाणार आहे. हिंदीमध्ये तो बॉक्‍स ऑफिसवर धमाका करणारा मोठा सिनेमा असणार आहे. हा एक सायन्स फिक्‍शन असणार आहे. त्याच्या टिजरच्या प्रदर्शनाच्यावेळी “3 डी’ गॉगल वाटले गेले होते. म्हणजे हा एक “3 डी’ सिनेमा असणार हे निश्‍चित. या वर्षाच्या अखेरीपर्यंत तो रिलीज होणे अपेक्षित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)