“ऍन्टी चेंबर’मध्ये कॅमेरे बसवण्याची मागणी

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वेळेत कामे होत नाहीत. केवळ आर्थिक देवाण-घेवाणीत हे अधिकारी मश्‍गुल असतात. त्यांच्या या स्वैरवर्तनावर बंधने आणण्यासाठी अधिकाऱ्यांच्या ऍन्टी चेंबरमध्ये सुस्पष्ट आवाज ऐकू येणारे सीसीटीव्ही बसवावेत. तसेच, या अधिकाऱ्यांना वचक बसविण्यासाठी नव्याने धोरण तयार करण्याची मागणी स्थायी सदस्यांनी केली. बुधवारी (दि.5) पार पडलेल्या स्थायीच्या साप्ताहिक सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रविण आष्टीकर यांच्याकडे महापालिकेतील लहानमोठ्या अशा एकूण 22 विभागांचा पदभार सोपविण्यात आला आहे. शिक्षकदिनानिमित्त शिक्षण समितीने कोणतीही कार्यवाही केली नाही. परिणामी शहरातील गुरुजनांचा या अधिकाऱ्यांनी अवमान केला आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी पाच लाख रुपयांच्या तरतुदीला मान्यता देऊनही केवळ अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शिक्षक दिन साजरा होवू शकला नाही. ही लाजीरवाणी बाब आहे. या शब्दांत राजू मिसाळ यांनी अधिकाऱ्यांचा निषेध नोंदविला.

राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांना शहरातील नागरिक व लोकप्रतिनिधींचे काही देने-घेणे नसते. त्यामुळे ते पूर्ण क्षमतेने सेवा देत नाहीत. महापालिकेतील अधिकाऱ्यांकडून फक्त खिसेभरूपणा केला जातो, असा आरोप अमित गावडे यांनी केला. त्यामुळे या अधिकाऱ्यांविषयीचे नव्याने धोरण तयार करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच एकाच अधिकाऱ्याकडे अनेक विभागांचा पदभार असल्याने, याचा परिणाम या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर होत आहे. या बाबींचा विचार करुन आयुक्त हर्डीकर यांनी या विभागांचा अतिरिक्त पदभार अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवावा, अशीदेखील मागणी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)