ऍड. सचिन तिरोडकर यांची निवड

सातारा: कारी (ता. सातारा) येथील जानाई देवी शिक्षण मंडळ संचलित श्री समर्थ रामदास विद्यालय कारी येथील शाळा समिती अध्यक्षपदी शाहूनगर (सातारा) येथील ऍड. सचिन तिरोडकर यांची नुकतीच निवड करण्यात आली.

ऍड. तिरोडकर हे अश्वमेघ पतसंस्था, चॅरिटी ऍडव्होकेट्‌स बार असोसिएशन सातारा, सातारा जिल्हा शरीरसौष्ठव संघटना तसेच प्रतापसिंहराजे (थोरले) नगरवाचनालयाच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. या क्षेत्रातील कामाची दखल घेऊन त्यांची शाळा समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या पदाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणार असल्याचे ऍड. तिरोडकर यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शाळा समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ऍड. तिरोडकर यांचे संस्थेचे अध्यक्ष नामदेव मोरे, कार्यवाहक, एम. एन. जाधव, मुख्याध्यापक, कर्मचारी तसेच संस्थेचे सभासद व ग्रामस्थ तसेच सातारा शहर परिसरातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)